-

धर्माची विधायक आणि कृतीशील चिकित्सा करणे हे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या चतुःसूत्रीपैकी एक सूत्र आहे. विसर्जित गणपती दान करणे, फटाकेमुक्त दिवाळी साजरी करणे, होळीची पोळी दान करणे अशाप्रकारे पर्यावरण सुसंगत सण उत्सव साजरे करणे किंवा बकरी ईद निमित्त बकर्यांची कुर्बानी देण्याऐवजी रक्तदान करून कुर्बानीचा नवा अर्थ प्रत्यक्षात आणणे अशा उपक्रमांतून अंनिस हे कृतीशीलरित्या करत आलेली आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातील वेगवेगळ्या धर्मातील तरुणांनी त्यांचे धार्मिक जीवन व त्याच्याशी संबंधित वर्तन समकालीन चिकित्सक नजरेतून पाहिले तेव्हा त्यांना त्यात कोणते बदल करावेसे वाटले? कोणते बदल करणे शक्य झाले? ही प्रक्रिया कशी प्रत्यक्षात आली व येत आहे? याबद्दल प्रत्यक्ष उदाहरणे देऊन त्या त्या धर्मातील तरुण तरुणानी या परिसंवादात लिहिले आहे.

या परिसंवादात इस्लाम बद्दल पैगंबर शेख, ख्रिश्चन धर्माबद्दल डॅनियल मस्करणीस, बौद्ध धर्माबद्दल संदीप पवार, लिंगायत धर्माबद्दल वैशाली जंगम तसेच जैन धर्माबद्दल कल्याणी अक्कोळे हे तरुण तरुणी व्यक्त झालेले आहेत. त्यांनी आपल्या धर्मातील सण, उत्सव, कर्मकांडे, परंपरा, जन्म, मृत्यू, विवाह, धार्मिक या व इतर मुद्यांच्या संदर्भातील प्रत्यक्ष उदाहरणे देऊन आपले म्हणणे या परिसंवादात मांडले आहे. विविध धर्मातील विधायक धर्म चिकित्सेबद्दलचा विचार व समकालीन कृती या दोन्हींचा संदर्भ घेत त्यांनी या विषयाची मांडणी केली आहे.
चिकित्सेची अॅलर्जी कोणाला?
पैगंबर शेख
नीरक्षीरविवेक जपायला हवा!
डॅनिअल मस्करणीस
पुढील पिढीला कोणती धर्मतत्वे देणार?
कल्याणी अक्कोळे
शरणांचा समतेचा विचार पुढे नेऊ!
वैशाली आनंदा जंगम
बौद्धधम्माला जातपंचायतीचे ग्रहण
संदीप पवार