विजय खरात -
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, बेलापूर व नेरुळ शाखेच्यावतीने दरवर्षी शहीद भगतसिंग वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येते, हे या स्पर्धेचे सहावे वर्ष आहे. यावेळी ही स्पर्धा दिनांक १७ सप्टेंबर २०२३ रोजी बेलापूर येथील पीपल्स एज्युकेशन सीबीएससी शाळेत संपन्न झाली.
स्पर्धेची सुरुवात बेलापूर शाखेचे विजय खरात यांनी “आम्ही प्रकाश बीजे रुजवीत चाललो…” या गाण्याने केली, त्यानंतर नेरुळ शाखेचे रमेश साळुंखे सर यांनी मंत्राने दिवा पेटवण्याचे प्रात्यक्षिक करून स्पर्धेचे उद्घाटन केले.
यानंतर स्पर्धक विद्यार्थ्यांचे तीन गट तयार करून त्यांची प्राथमिक फेरी घेण्यात आली. प्राथमिक फेरीत प्रत्येक गटातून चार स्पर्धकांना निवडण्यात आले आणि एकूण बारा स्पर्धकांची अंतिम फेरी घेण्यात आली. या अंतिम फेरीत तीन विजेते व दोन उत्तेजनार्थ असे पाच विद्यार्थी स्पर्धक निवडण्यात आले.
प्राथमिक फेरीचे परीक्षक म्हणून पुढील मान्यवरांनी काम पाहिले. रमेश साळुंखे, सुकन्या जाधव, अर्चना सोनवणे, संजय उबाळे, मनीषा पाटील, मनीषा खरात, संगीता नेहते, लेखा नवरे, श्रद्धा जाधव यांनी काम पाहिले. तर अंतिम फेरीचे परीक्षक म्हणून रमेश साळुंखे, संजय उबाळे, संगीता नेहते यांनी काम पाहिले.
अंतिम फेरीत विजेते झालेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढील प्रमाणे :
प्रथम क्रमांक : स्नेहा सुनील घाटे (शिरवणे विद्यालय, नेरूळ)
विषय – ‘नव्या युगाची मी युवती झुगारीन अंधरूढीची भीती’
द्वितीय क्रमांक : मैथिली सुनील नाईक (रा. फ. नाईक विद्यालय, कोपरखैरणे) विषय – ‘सोशल मीडिया एक व्यसन’
तृतीय क्रमांक : लक्ष्मी कडेकर (ज्ञानदीप सेवा मंडळाचे मराठी हायस्कूल)
विषय – ‘सोशल मीडिया एक व्यसन ’
उत्तेजनार्थ एक : भक्ती संतोष गावडे (विद्या भवन सेकंडरी मराठी माध्यम, नेरूळ)
विषय – ‘सोशल मीडिया एक व्यसन’
उत्तेजनार्थ दोन : सिद्धी तुकाराम गोरे (रा. फ. नाईक विद्यालय कोपरखैरणे)
विषय – ‘सोशल मीडिया एक व्यसन’
शहीद भगतसिंग वक्तृत्व स्पर्धेत नवी मुंबईतील १३ शाळातून ६९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ६२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या अखेरीस सुकन्या यांनी बंधन तोडीत यावं हें गाणं घेत, विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून तसेच सर्व उपस्थित विद्यार्थ्यांचे, पालकांचे व शिक्षकांचे आभार मानून सहाव्या शहीद भगतसिंग वक्तृत्व स्पर्धेचा समारोप करण्यात आला.
सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राजू देशपांडे, बी बी पवार सर, रेखा देशपांडे, त्रिशीला कांबळे, नरेश पाटील, दिलीप पाटील, रमेश साळुंखे सर, प्रशांत भोर सर, विजय खरात यांनी विशेष मेहनत घेतली.
–विजय खरात
कार्याध्यक्ष, बेलापूर शाखा