रहिमतपूर शाखेतर्फे वटपौर्णिमेनिमित्त प्रबोधन

शंकर कणसे -

वटपौर्णिमेचे औचित्य साधून शंकर कणसे (नाना) यांच्या फार्म हाऊसवर वटपौर्णिमा म्हणजे काय, वटपौर्णिमेबद्दलचे समज आणि गैरसमज दूर करण्यासाठी प्रबोधनात्मक उपक्रम घेण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे ‘वटसावित्री’ या विषयावरील व्याख्यान ऐकवून झाली. हे व्याख्यान सर्व महिला गुंग होऊन ऐकत होत्या व ते ऐकत-ऐकत खूप हसल्या. त्यांच्या या हसण्यावरूनही त्यांना एकंदरीत दाभोलकर सरांचे मत पटल्याचे समजत होते. व्याख्यान संपल्यावर शंकर कणसे यांनी वटसावित्रीबद्दलचे महिलांमध्ये असलेले अज्ञान समजावून सांगितले. तसेच चंद्रहार माने सरांनी ही या सर्व कल्पना भ्रामक आहेत हे पटवून दिले. अंकिता कणसे यांनी याविषयीचा एक लेख वाचून दाखवत महिलांना प्रबोधनात्मक मार्गदर्शन केले. कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सर्व महिलांना हा विचार पटला व त्यांनीही आपले मत मांडले की हा सण आम्ही फक्त आमच्या घरातील आमची सासू किंवा त्यांच्या आधी अजून कोण ज्येष्ठ हे परंपरेने करत आले आहेत, म्हणूनच आम्ही वडाला फेर्‍या मारतो, वडाची पूजा करतो व त्याकडे जन्मोजन्मी हाच नवरा मिळावा, अशी प्रार्थना करत असतो. कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्व महिला या सर्वसामान्य कुटुंबातील होत्या. त्यांना आज हा विचार पटवून देताना खूप आनंद झाला आणि त्यांना तो विचार पटला, याचा त्यापेक्षाही अधिक आनंद झाला.

या कार्यक्रमाला रहिमतपूर शाखेचे शंकर कणसे, शिवाजी शिंदे, मोहसीन शेख, चंद्रहार माने, अमर माने, अंकिता कणसे, प्रवीण माने व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

शंकर कणसे, रहिमतपूर


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ]