पंढरपूरच्या देवदासीची केली जटेतून मुक्तता

नंदिनी जाधव - 9422305929

पंढरपूर येथील रेणुका इनामदार यांची जट काढावयास गेलो असता त्यांच्याच मावशी सीताबाई भजनावळे (वय 60) याही देवदासी आहेत. यांच्याही डोक्यात गेली 30 वर्षांपासून जट असल्याचे सांगण्यात आले. तेव्हा सीताबाई भजनावळे यांना रेणुका इनामदार यांच्या घरी बोलावून त्यांच्याशी डोक्यात असलेल्या जटेबाबत चर्चा केली. त्यांनी सांगितले की जट काढण्यासाठी अनेक वेळा पूजा-अर्चा केली; तसेच 30 ते 40 हजार रुपयांचा खर्च केला; पण जटेचा त्रास काही कमी झाला नाही. या वाढलेल्या जटेमुळे मानेला, पाठीला खूप त्रास होत होता. तेव्हा सीताबाई यांना इतर महिलांच्या जटा काढलेले यांचे व्हिडिओ दाखवले. जट काढल्याने कोणाचं कधीही वाईट होत नाही. हा त्रास आणखी वाढण्याच्या आधीच डोक्यात असलेली जट काढण्याची विनंती केली. त्यांच्या मनातल्या सर्व शंका-कुशंका दूर केल्या. आणि त्यांनीही लगेचच जट काढण्यास होकार दिला. अशा पद्धतीने आज दोन देवदासींची जटेतून मुक्तता करण्यात आली.

याप्रसंगी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पुणे शहर सचिव सोहम व्होरा उपस्थित होते.