नरेंद्र दाभोलकर यांचे सहकारी जगूबाबा गोरड यांचे निधन

-

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे माणदेशाचे क्रियाशील ज्येेष्ट कार्यकर्ते जगूबाबा गोरड (रा. कापूसवाडी, ता. माण) यांचे हृदय विकाराच्या झटक्याने रविवारी सायंकाळी पाच वाजता कापूसवाडी येथे निधन झाले.

डॉ. नरेंद्र दाभालकर यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमाने श्री जगूबाबा गोरड यांनी राज्यभर दौरे करून बुवाबाजी, देवऋषीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेची जी फसवणूक करून लूट केली जात होती, त्याबाबत जनजागृती मोहिमेत त्यांचा सिंहाचा वाटा उचलला होता.

विशेष बाब म्हणजे पूर्वआयुष्यात ते स्वत: बुवाबाजीच करीत होते. बुवाबाजीत ग्रामीण व शहरी भागातीलही अनेकजणांची आपणाकडूनच फसणूक होत असल्याचे त्यांच्या मनास पटत नव्हते. ही प्रामाणिक खंत त्यांना सात्याने वाटू लागली.

गावोगावी मोठ्या संख्येने बुवाबाजी व देवऋषीमुळे भोळ्याभाबड्या जनतेची फसवणूक थांबली पाहिजे, यासाठी त्यांनी बुवाबाजीस रामराम करून डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीत सहभागी झाले. गेली ३२ वर्षे त्यांनी ‘मी बुवाबाजी कशी केली, लोक कसे फसत होते, बुवाबाजीसह देव, भूत विशेषत: ग्रामीण भागातील अशिक्षित महिलांच्या अंगात येणे हेच थोतांड आहे,’ याच विषयावर त्यांनी राज्यभर दौरे करून जनतेत जागृती करून अंधश्रद्धांविरोधात मोहीम राबविली. त्यांच्या पश्चात त्यांच्या समाजकार्याची निश्चितच इतिहासात नोंद राहील.


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ]