सोलापुरात गणपतीच्या मूर्तीच्या डोळ्यांतून अश्रूंचा चमत्कार अंनिसने थांबवला!

निशा भोसले -

सोलापूर जिल्ह्यातील कुंभारीजवळील होटगी रोड मार्गावरील बेनक गणपतीच्या डोळ्यांतून अश्रू येऊ लागले. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली; परंतु शहर अंनिसच्या कार्यकर्त्यांनी शास्त्रीय प्रमाण देत सर्व अफवा खोट्या असल्याचे सिद्ध केले आणि अखेर गणपतीच्या डोळ्यातील अश्रू थांबले. अंनिसने केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याचे स्पष्ट करण्यात आले.

ऐन सणासुदीच्या दिवसांत बेनक गणपतीच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले, असा फोटो व व्हिडीओ काढला व व्हायरल झाला, तर गणपतीची चांगली मूर्ती बसवावी व मोठे मंदिर बांधावे, अशी गणपतीची इच्छा आहे, अशा चर्चा शहरभर सुरू होत्या.

पुजार्‍याने फोटो व व्हिडीओ काढून ही अफवा पसरवली. अशा अफवांपासून नागरिकांनी सावध राहावे, असे पत्रक अंनिस सोलापूर शाखेच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आले आहे.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना ही अफवा समजताच त्यांनी मंदिरातील मूर्ती पाहून शास्त्रीय कारणे सांगून रासायनिक अभिक्रिया हातचलाखीमुळे अशा घटना घडतात, हे सिद्ध करून दाखविले. गावकर्‍यांना चर्चेसाठी बोलाविले व त्यांनी अंनिसच्या प्रबोधनास प्रसिसाद देत ही अफवा असल्याचे मान्य केले.

यासाठी सोलापूर अंनिसच्या टीममधील राज्य कार्यकारिणी सदस्या निशा भोसले, अंजली नानल, उषा शहा, लता ढेरे, शहराध्यक्ष प्राचार्य डॉ. राजेंद्रसिंह लोखंडे, कार्याध्यक्ष व्ही. डी. गायकवाड, सचिव लालनाथ चव्हाण, आर. डी. गायकवाड, ब्रह्मानंद धडके, यशवंत फडतरे, कुंडलिक मोरे, डॉ. अस्मिता बालगावकर, कमलाकर जाधव, सौरभ सांगळे, नितीन आणवेकर यांनी प्रयत्न केले.

निशा भोसले, सोलापूर


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ]