राहुल विद्या माने -
–राहुल माने
मेरिट या शब्दाला जन्म दिलेले मायकेल यंग (१९१५-२००२) यांना गेल्या शतकातील सर्वात महान व्यावहारिक समाजशास्त्रज्ञ असे म्हटले जाते. त्यांना इंग्लंडमधील कामगार वर्गाच्या सामाजिक जीवनाचा आधुनिक वैज्ञानिक संशोधन पद्धतीने वेध घेतल्याचे श्रेय दिले जाते. वर्गसंबंधांमुळे होऊ शकणार्या हानीला थोपवून धरण्यासाठी आयुष्यभर ते प्रयत्न करत होते. सामाजिक उतरंडीची जुनी, जातीसदृश व्यवस्थेच्या ठिकाणी नवीन कोणती व्यवस्था येऊ शकते? याचा ते विचार करत होते. आजकालच्या व्यक्तीसाठी यंगने स्वतः ६० वर्षांपूर्वी गुणवत्ता हा शब्द तयार केला होता. सत्ताशक्ती आणि विशेषाधिकार हे वैयक्तिक गुणवत्तेद्वारे वितरित केले जातील आणि ते त्यांच्या सामाजिक श्रेणी वा जन्माधिष्ठित स्थानावर अवलंबून नसतील, अशी त्यांची धारणा होती.
‘The Rise of the Meritocracy’ हे त्यांचे सर्वाधिक खपाचे पुस्तक १९५८ मध्ये आले. त्यात ‘गुणवत्ताधारी समाजाला शत्रू’ अशी उपमा देण्यात आली. दूरगामी भविष्यात श्रीमंती ही कमावली जाऊ शकते, ती वारसा हक्काने मिळवली जात नाही, यावर पुस्तकात भर होता. नवीन सत्ताधारी वर्गाचा उदय हा “बुद्ध्यांक (IQ) आणि प्रयत्न = गुणवत्ता” या बेरजेतून होतो अशी मांडणी त्यांनी केली. लोकशाहीमुळे सर्वात हुशार अशा व्यक्तींना प्राधान्य मिळेल आणि केवळ जन्म, संपत्ती यामुळे मिळत असलेल्या विशेषाधिकाराला महत्त्व राहणार नाही. गुणवत्ता (meritocracy) हा पहिल्यांदा आलेला शब्द होता. यावर आधारित पुढील समाज कसा असू शकेल याचे वर्णन या पुस्तकात होते.
शैक्षणिक आणि नोकरीच्या मर्यादित संधी असल्यामुळे आपणाकडे विविध लोकांच्या पदाला शोभून राहील अशा पद्धतीने आणि योग्य ते प्रोत्साहन देऊन आवश्यक काम पार पाडून घेणे महत्त्वाचे ठरवले गेले. जर हे निवडीचे निकष पुरेशा कुशलतेने जर आखले गेले तर शाळेमध्ये येणारे किंवा नोकरी मिळण्यासाठी येणार्या लोकांची सोय होईल. त्यांचा हा हक्क आहे. याचा अर्थ असा नाही की ज्यांना शिक्षणाची आणि नोकरीची संधी देणारी लॉटरी लागते ते अधिक लायकीचे आहेत आणि यात संधी न मिळणारे कमी लायकीचे आहेत. कोणत्याही यशाच्या सर्वोच्च अशा शिखरावर तेथे अनेक शक्यता सक्रिय असतात.
जर आईन्स्टाईनचा जन्म शतकभर आधी झाला असता तर त्याने कदाचित त्याच्या क्षेत्रात कोणतेही महत्त्वाचे शोध त्याने लावले नसते. जर मोझार्ट हा विसाव्या शतकात जन्मला असता तर त्याचे संगीत एवढे बहारदार झाले नसते. जर ते अमेझॉन खोर्यात वाढले असते तर त्यांची बौद्धिक योग्यता कदाचित एवढी कामाला आली नसती. लहानपणापासून आपली जोपासना कशी होते यावर आपण किती कठोर परिश्रम करतो यावर सर्व काही अवलंबून असते. म्हणून केवळ बुद्धिमत्ता आणि प्रयत्न हे गुणवत्तेच्या संदर्भात निर्णायक ठरत नाहीत. जे लोक कमी यशस्वी असतात हे इतर व्यक्तींपेक्षा कमी लायक नसतात. त्यामुळे त्या दोन्हींची कोणत्याही संवेदनशील पद्धतीने तुलना केली जाऊ शकत नाही.
संदर्भ : गार्डियन या नियतकालिकेत प्रकाशित झालेला The myth of Meritocracy : who really gets what they deserve? लेख