सोनाली कुलकर्णी -
अंधश्रद्धा निर्मूलन हा शब्द ऐकून काहीजण दुखावतात… दुसर्या माणसांची, राज्यांची, धर्मांची अंधश्रद्धा दिसत नाही का? असं म्हणतात…
दिसते ना.. दिसतेच..
पण आपल्याला जर कोणी चेतावणी देत असेल की पूर येणार आहे.. किंवा भूकंप होणार आहे.. तर आपण स्वतःला वाचवू – की सांगणार्यावरच चिडू – तू शेजारच्या गावाला सांग आधी म्हणून..?
शहाणं होणं हा पर्याय आहे आपल्यासमोर.. तो निवडूया.
आपल्या देवावरच्या विश्वासाला कोणीही नाकारू शकत नाही. तो आपला हक्क आहे. पण त्यापायी होणारी पिळवणूक आणि सोयीस्करपणा दोन्ही घातक आहेत याची जाणीव ठेवूनच पुढचं पाऊल उचलूया..
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन… आणि त्यांच्या खुनाचा तीव्र निषेध.
– सोनाली कुलकर्णी
सिने अभिनेत्री