-
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राने मे 2021 चा अंक छद्म विज्ञान विरोधी’ विशेषांक प्रकाशित केला होता. या विशेषांकावर आधारीत ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धा बॅ नाथ पै सेवांगण उपक्रम समुह, मालवण यांच्या वतीने घेण्यात आली. या स्पर्धेला संपूर्ण महाराष्ट्रातून 68 स्पर्धकांनी सहभाग घेतला. या प्रश्न मंजूषा स्पर्धेत 40 टक्केपेक्षा जास्त गुण मिळालेल्या स्पर्धकांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे.
या स्पर्धेची प्रश्नोत्तरे बॅ नाथ पै सेवांगण उपक्रम समुहाच्या कट्टा शाखेचे अध्यक्ष किशोर शिरोडकर यानी’ तयार केली. बॅ. नाथ पै सेवांगण परिवाराने खूप मेहनत घेत ही स्पर्धा यशस्वी केली.. या पूर्वीही बॅ. नाथ पै सेवांगणाने गतवर्षीच्या ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर विशेषांका’वर अशीच प्रश्न मंजूषा स्पर्धा आयोजित केली होती.