नंदिनी जाधव -
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती पुणे जिल्ह्यातर्फे ३०० व्या महिलेची जटेतून मुक्तता… एकाच दिवशी तीन महिलांची जट निर्मूलन (३०१ व ३०२)
सोलापूर जिल्ह्यातील अंबाड गावातील कुसुम खांडे वय ६५ वर्षे यांच्या डोक्यात गेली तीन वर्षापासून तयार झाली होती. जटे मुळे त्यांना शारीरिक त्रास होत असल्यामुळे भीमराव खांडे , बंडू खांडे, बापूराव कदम या सर्वांनी आजींची समजूत काढून जट काढण्यासाठी तयार करून जट काढण्याची विनंती केली असता अंबाड (ता. माढा) या गावी जावून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यकारणी सदस्य नंदिनी जाधव, मिलिंद देशमुख यांनी आजीच्या मनातील भीती दूर करून जट निर्मूलन करण्यात यश आले.
नंदिनी जाधव महा. अंनिस राज्यकार्यकारिणी सदस्य संपर्क ९४२२३०५९२९