कॅन्सर बरा करतो सांगून अडीच लाख रुपये लाटले

श्रीपाल ललवाणी - 9823977472

मनोहर मामावर बारामती येथे पहिला गुन्हा दाखल : अंनिसचा पाठपुरावा

बारामती येथील रहिवासी शशिकांत खरात यांच्या वडिलांना कॅन्सर झाला होता. त्यांच्या एका मित्राच्या सांगण्यावरून ते उंदरगाव, (ता. करमाळा, जि. सोलापूर) येथील, स्वतःला बाळूमामांचा अवतार म्हणवणार्‍या मनोहर भोसले या बुवाकडे गेले. त्या बुवाने त्यांना पाहताच त्यांचे भविष्य सांगण्यास सुरुवात केली. तुमच्या वडिलांना कॅन्सर झाला आहे, असे त्याने सांगताच खरात आश्चर्यचकित झाले व त्यांची खात्री पटली की, त्या बुवाकडे दैवी शक्ती आहे. तुमच्या वडिलांचा कॅन्सर मी पूर्ण बरा करतो. पण त्यासाठी तुम्हाला पाच अमावस्येला येथील वारी करावी लागेल, असे त्या बुवाने खरात यांना सांगितले. त्याप्रमाणे खरात तेथे दर अमावस्येला गेले. प्रत्येकवेळी त्यांच्याकडून 5000 रुपये घेतले गेले. तरी वडिलांना फरक न पडल्याने 2 लाख 25 हजार रुपये मागितले गेले. तेही खरात यांनी भरले; पण कॅन्सरमध्ये काहीही फरक पडला नाही. डॉक्टरांच्या सांगण्यावरून वडिलांचे ऑपरेशन केले गेले आणि मगच वडिलांना बरे वाटले. यानंतर शशिकांत खरात पुन्हा उंदरगावला गेले आणि त्यांनी आपले पैसे परत मागितले. यावर, त्यांना मारहाण करण्यात आली व परत आल्यास इथेच मारून पुरून टाकू, असा दमही भरण्यात आला.

यानंतर शशिकांत खरात यांनी 6 सप्टेंबर, 2021 रोजी बारामती ग्रामीण पोलीस स्टेशन येथे मनोहर भोसले व त्याच्या हस्तकांविरुध्द तक्रार अर्ज दाखल केला. पोलिसांनी अर्ज स्वीकारला; पण एफआयआर केली नाही. फिर्यादीने यानंतर डॉ. हमीद दाभोलकरांकडे अर्ज दाखल करून मदतीची अपेक्षा व्यक्त केली. डॉ. हमीद यांनी पुणे जिल्ह्यातील राज्य कार्यकारी समिती सदस्य नंदिनी जाधव यांना याबाबतीत लक्ष घालण्यास सांगितले. त्याप्रमाणे नंदिनी जाधव यांनी शशिकांत खरात यांच्याशी संपर्क साधून त्यांना पुण्यात बोलाविले. त्यांना घेऊन नंदिनी जाधव, मिलिंद देशमुख, प्रा. सुभाष सोळंकी हे पुणे ग्रामीण अधीक्षक अभिनव देशमुख यांना भेटले. देशमुख साहेबांनी सर्व गोष्टी समजून घेतल्या. त्यांनी बारामती ग्रामीण प्रमुख मिलिंद मोहितेसाहेब यांना फोन करून गुन्हा दाखल करण्यास सांगितले. खरात यांच्याबरोबर नंदिनी जाधव बारामती ग्रामीण पोलीस स्टेशनला गेल्या. नंदिनी जाधव यांनी बारामती येथील कार्यकर्त्यांनाही बोलावून घेतले. मिलिंद देशमुख व सोळंकी सरही तेथे पोचले. पोलिसांनी अतिशय बारकाईने सर्व गोष्टींची चौकशी केली. सर्व होता-होता रात्रीचे 1.30 वाजले. तोपर्यंत कार्यकर्तेही थांबून राहिले आणि पोलीसही! रात्रीचे दीड वाजले तरी कार्यकर्ते थांबून राहिले आहेत, हे पाहून पोलिसांनी त्यानंतर मध्यरात्री एफआयआर तयार केली. नंदिनी जाधव, मिलिंद देशमुख, प्रा. सोळंकी, ज्ञानदेव सरवदे, तुकाराम कांबळे, अ‍ॅड. आकाश दामोदरे, गोपी खैरनार हे कार्यकर्ते रात्री अडीच वाजेपर्यंत पोलीस स्टेशनला थांबले होते. एफआयआर तयार झाल्यानंतरच कार्यकर्ते आपापल्या घरी गेले. सर्व पोलीस स्टाफने चांगले सहकार्य केले. विशेष पथकाद्वारे तपास करून मनोहर भोसले याला अटक करण्यात आली.


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ]