डॉ.दाभोलकर विशेषांकाचे वाचकांकडून राज्यभर स्वागत

-

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर अभिवादन विशेषांक सर्वत्र ऑनलाईन पोचवण्याच्या उपक्रमाबाबत आलेल्या काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया

शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर अभिवादन विशेषांक खूपच छान आहेत. मी डॉक्टरांचे ‘विवेकाची पताका घेऊ खांद्यावर’ हे पुस्तक वाचले आहे. तेव्हापासून मी त्यांचे कार्य आणि विचार लोकांपर्यंत पोचविण्याचा आपल्यापरीने प्रयत्न करत आहे. प्रत्येक व्यक्तीने आपली विवेकबुद्धी जागृत ठेवून विचारपूर्वक वागले तर अंधश्रद्धा निश्चितच दूर होतील, असे मला वाटते.

योगेश जानराव, जातेगाव, ता. नांदगाव, नाशिक


शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर अभिवादन विशेषांक वाचले. 2015 च्या अंकातील संजय आवटे यांचा ‘चकमकीत ते बाजी मारतील; पण युद्ध आपणच जिंकणार आहोत’ हा लेख खूप म्हणजे खूप चांगला वाटला. तसेच ‘दाभोलकर मरते नहीं, वो हमेशा जीते है’ हाही लेख खूपच प्रभावी आहे. डॉक्टरांनी लिहिलेला ‘मी कार्याध्यक्षपद सोडले’ हा लेख वाचनीय आहे. बाकी सर्व लेखकांच्या लेखणीतून डॉक्टरांविषयी खूपच माहिती मिळाली. विशेष म्हणजे’ ‘अंनिस’ वार्तापत्र मासिक टीमचे शतशः आभार! कारण हे जे मौल्यवान लेख आहेत, ते आपण माझ्यासाठी उपलब्ध करून दिले.

संतोष जगताप, बोरामणी, सोलापूर


शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर अभिवादन विशेषांकातील प्रगल्भ लेख वाचून ज्ञानात मोलाची भर पडत आहे. तसेच त्यामुळे जीवनातील सकारात्मकता टिकून राहते. विशेषांक ‘पीडीएफ’ स्वरुपात सहज उपलब्ध केल्याने या विचारांचा प्रसार तात्काळ आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाण्यास मदत होणार आहे. डॉक्टरांची ‘यू ट्यूब’वर उपलब्ध असलेली बहुतेक सर्व व्याख्याने मी लक्षपूर्वक ऐकली आहेत. त्यांचं व्याख्यान म्हणजे सहज सुंदर शब्दांत प्रबोधन आहे. विशेष म्हणजे अनावश्यक असा कोणताही फाफटपसारा न मांडता ते बोलत. यातूनच मला वैज्ञानिक दृष्टिकोनातून आजूबाजूला पाहण्याची शिकवण मिळाली. प्रत्येक गोष्ट चिकित्सक बुद्धीने तपासून घेण्याची सवय लागली आणि माझ्या कुटुंबीयांची, काही मित्रांची विचारसरणी त्याप्रमाणे होण्यासाठी मोलाची मदत झाली.

भागवत थडवे, उस्मानाबाद


शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर अभिवादन विशेषांक वाचले. 2017 च्या अंकात डॉ. हमीद दाभोलकर यांनी मांडलेली तपासातील दिरंगाई खूपच संतापजनक आहे. विनायक सावळे यांनी लिहिलेल्या घडामोडी अतिशय समाधान देतात. कृष्णात स्वाती यांनी दाभोलकरांवर लिहिलेला पोवाडा अप्रतिम आहे. अविनाश पाटील यांची डायरी वाचली आणि सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा म्हणजे ‘अंनिस’च्या शिरपेचातला तुरा आहे, हे पटले.

श्रीसिद्ध ढवळे, पुणे


शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर अभिवादन विशेषांकांचे वाचन म्हणजे विचारांची मेजवानीच आहे. डॉक्टरांची अंधश्रद्धेवर प्रहार करण्याची अभ्यासपूर्ण शैली, स्वतःच्या विचारांची स्पष्ट मांडणी समोरच्याला निरुत्तर करणारी आहे त्यांचे आणि त्यांच्यावरील अनेक लेख कायम संग्रही असावेत, असे आहेत. या सर्व कामामागे त्यांचा किती प्रचंड अभ्यास असेल, याची कल्पना येते. त्यासाठी त्यांनी केलेला त्याग पाहिला की, आपल्याला स्वतःची लाज वाटायला लागते.

प्रदीप पाटील, पुणे


आपला हा उपक्रम माझ्यासाठी एक पर्वणीच आहे. आपला मेसेज आला की, कधी एकदा पाहतो वाटते. त्यातील अनुक्रमणिका पाहून कोणता लेख लवकर वाचता येईल, असे होऊन जाते. आपले आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. मी आपला खूप आभारी आहे. माझ्या ‘पीएच. डी.’ कार्याला आपल्यामुळे गती मिळाली आहे, खूप खूप आभार!

– मोहन लोणकर, संशोधक विद्यार्थी, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर


‘अंनिस’ वार्तापत्राचे जुने दाभोलकर विशेषांक ‘पीडीएफ’ स्वरुपात सर्वत्र पोचवण्याचा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. कायमस्वरुपी जतन करण्याचा मौल्यवान दस्तऐवज आहे हा. आपल्यासारख्या कार्यकर्त्यांनी, ज्यांना दाभोलकरांचा प्रत्यक्ष सहवास लाभला, त्यांच्यासाठी पुन्हा दाभोलकरांना भेटल्यासारखं आहे. ते आपल्या विचारांनी या अंकाच्या रुपात पुन्हा भेटायला आलेत, असं मला वाटलं. खूपच चांगला उपक्रम आहे. मी अनेकांना हे अंक ‘फॉरवर्ड’ केले आहेत. त्यांच्याकडूनही चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहेत. या उपक्रमात माझी काही मदत लागली तर सांगावे…

प्रसाद माळी, पत्रकार, सांगली


डॉक्टरांच्या हत्येचा इंपॅक्ट होऊन मोठ्या प्रमाणात तरुण नव्यानं ‘अंनिस’सोबत जुळलेले आहेत. त्यांनी हे वाचलेले नाहीत. सर्व तरुण वर्ग सोशल मीडियावर आहे. त्यांच्यापर्यंत हे अंक ती जुनी माहिती घेऊन जात आहेत. यासाठी हीच योग्य वेळ आहे सध्या सर्वांकडे भरपूर रिकामा वेळ आहे. आता मोबाईलमध्ये मोफत भेटणारे हे अंक चाळून, वाचून ‘अंनिस’सोबत जोडून घेणारे नवे कार्यकर्ते लॉकडाऊननंतर ‘अनिवा’चे वर्गणीदार नक्की होतील. यामुळे तुम्ही योग्य वेळी योग्य उपक्रम सुरू केला आहे.

श्रीनिवास शिंदे, नांदेड


खूप चांगला व महत्त्वाचा उपक्रम! वार्तापत्राच्या 2013 डॉ. नरेंद्र दाभोलकर विशेषांकावर आम्ही ऑनलाईन परीक्षा लवकरच घेणार आहोत. ... देवदत्त परूळेकर, वेंगुर्ला


हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा! अनुकरणीय उपक्रम!!

प्रा. सुनीलकुमार लवटे, साहित्यिक, कोल्हापूर


डॉ.नरेंद्र दाभोलकर विशेषांक फारच चांगले झाले आहेत. यातील लेखांच्या आधारे दाभोलकरांच्या कार्यावर समग्रतेने लिहायला हवे.

गजानन खातू, मुंबई


हा उपक्रम निश्चितच खूप चांगला आहे. अलिकडे आमच्या गावातील पोस्टाची सेवा खूपच विस्कळीत झाली असल्यांने अंक किंवा टपाल मिळत नाहीत. या कारणास्तव माझ्यासारखे अनेक वाचक ‘अंनिस’ वार्तापत्रापासून वंचित राहिले असावेत, असा माझा कयास आहे. तर ही अडचण आता आपण इंटरनेटवर ऑनलाईन अंक देऊन दूर केली आहे. स्मार्टफोनवर आपण ‘पीडीएफ’मध्ये अंक पाठवत असल्याने खूप चांगली सोय झाली आहे. मी काही पुस्तके खरेदी करू इच्छितो व अंकाची वर्गणीही पाठवणार आहे.

प्रा. बी. टी. बंडगर, कोल्हापूर


खूपच छान आणि स्तुत्य उपक्रम आहे. अंक पीडीएफ डिजिटल असल्यामुळे हजारो लोकांपर्यंत क्षणार्धात पोचता येतं आणि त्याचा चळवळीशी माणसं जोडली जाण्यावर खूप चांगला परिणाम नक्कीच होईल, अशी खात्री वाटते.

शिरीष कुंभारकर, मुंबई


अतिशय छान उपक्रम. या उपक्रमामुळे अनेक साथींना जुने अंक वाचावयास मिळतील. याचा फायदा वर्गणीदार वाढण्यास निश्चित होईल.

– प्रा. प्रकाश भोईटे, गडहिंग्लज


जुलै 2020 अंक आवडला

जुलैच्या अंकातील डॉ.प्रदीप जोशी सर मानसोपचार तज्ञ यांचा आत्महत्या हा पर्याय नव्हे! हा लेख वाचला. खूप छान आणि खरी वस्तुस्थिती मांडणारा लेख आहे. माणसाला परिस्थिती बदलता येत नसेल तर, मन स्थिती बदलावी, हा एकमेव उपाय त्यावर असावा असे वाटते.

अ‍ॅड.रंजना गवांदे मॅडम लिखित ‘मारण्यात कसलं आलयं ऑनर?’ हा लेख सुद्धा आवडला. तसं पाहिलं तर सर्व लेख आणि माहिती उत्कृष्ट आणि वाचनीय आहे.

सुरेश थोरात, धुळे


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ]