-
प्रा. प. रा. आर्डे लिखित ‘फसवे विज्ञान ः नवी बुवाबाजी’ या पुस्तकाची भाषा अतिशय, सोपी, ओघवती कुणालाही सहज समजणारी आहे. काही धूर्त लोक खुळचट गोष्टी कशा प्रकारे विज्ञानाशी जोडून भ्रम निर्माण करतात हे अनेक उदाहरणांतून आपण स्पष्ट केले आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे नेमके काय? हे आपण अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने स्पष्ट केले आहे. केवळ आडाणीच नव्हे तर विज्ञान शिकलेले विद्यार्थी, इंजिनियर्स डॉक्टर्स, शास्त्रज्ञ सुद्धा कसे फसतात हे उदाहरणासह आपण सांगितले आहे. मी बर्यापैकी वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणारा आहे परंतु तरीही तुमच्या पुस्तकाने माझ्या डोक्यातील सारी जाळी जळमटे निघून गेली विशेषतः चुंबक उपचार, बर्म्युडा ट्रँगल, यती, अॅक्यूपंक्चर या बाबतीतील माझे सगळे भ्रम दूर झाले. डोकं स्वच्छ झालं. आपले हे पुस्तक प्रत्येक सुशिक्षित व्यक्तीने वाचलेच पाहिजे कारण सुशिक्षितांच्या अंधश्रद्धा फार भयानक असतात. मला तर वाटते प्रत्येक शिक्षकाने हे पुस्तक आवर्जून वाचले पाहिजे. आपण अतिशय परिश्रमपूर्वक हे पुस्तक लिहिले आहे त्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन! तसेच प्रकाशक : अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र यांना मनःपूर्वक धन्यवाद!
– रमेश साळुंके, नेरूळ, नवी मुंबई