सोलापूर येथे अंनिस राज्य कार्यकारिणीची बैठक संपन्न

-

शोषणाला विरोध हा अंनिस आणि कामगार चळवळीचा समान धागा कॉ. नरसय्या आडम

शोषणाला विरोध हा अंनिस आणि कामगार चळवळी मधला समान धागा आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर माझे सहकारी होते. जादूटोणाविरोधी कायदा मंजूर होण्यासाठी मी त्यांच्या सोबत काम केले. पण त्यांच्या खुनाचा केस निकाल लागायला अकरा वर्षे लागतात आणि अर्धाच न्याय मिळतो ही लोकशाही मधली शोकांतिका आहे, असे मत कॉ. नरसय्या आडम यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यकारिणी बैठकीच्या उद्घाटन प्रसंगी केले. कार्यक्रमाचे उद्घाटन हे अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचा ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर खून खटला निकाल विशेषांक’ प्रकाशन करून करण्यात आले.

या प्रसंगी कॉ. आडम पुढे म्हणाले की, मनुस्मृतीची पुनर्स्थापना करण्याची इच्छा असलेल्या लोकांची सध्या चलती आहे. अशा कालखंडात लोकांना शहाणे करण्याचे काम आपल्याला करत राहावे लागेल. ज्या देशात ज्योतिष्यांच्या सांगण्यावरून शपथविधी पुढे ढकलला जातो आणि निवडणूक अर्ज देखील मुहूर्त बघून भरले जातात अशा समाजात आपली लढाई चालू आहे. हजारो वर्षे शोषण करणार्‍या व्यवस्थेविरुद्ध आपली लढाई आहे, पण जशा प्रकारे नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये जसे लोकांनी राज्य घटना बदलू इच्छिणार्‍या लोकांना धडा शिकवला त्याच प्रेरणेने आपल्याला काम करावे लागणार आहे.”

कॉ. आडम पुढे म्हणाले की, अंनिसचे कार्यकर्ते हे लोकांना विचार करायला उद्युक्त करतात हे देखील राजकीय प्रबोधन करण्यासाठी महत्त्वाचे आहे. ते काम त्यांनी सातत्याने करत राहावे असे आवाहन देखील त्यांनी केले.

उषा शहा यांनी स्वागत, मुक्ता दाभोलकर यांनी प्रास्ताविक, अस्मिता बालगावकर यांनी सूत्रसंचालन तर प्रा. अशोक कदम यांनी आभार मानले.

उद्घाटक सत्रासाठी अंनिसचे राज्य कार्यकारिणी सदस्य मिलिंद देशमुख, फारुख गवंडी, डॉ. हमीद दाभोलकर, राहुल थोरात, निळकंठ जिरगे, नंदिनी जाधव, मुंजाजी कांबळे, सम्राट हटकर, विनोद वायंगणकर, प्रकाश घादगिने, गणेश चिंचोले उपस्थित होते.

दोन दिवस सोलापूर येथील हिराचंद नेमचंद सभागृहात शालिनीताई ओक विचारपीठावर अंनिसची राज्य कार्यकारिणी बैठक संपन्न झाली असून महाराष्ट्रातील १९ जिल्ह्यांतून २०० कार्यकर्ते आले होते.

दिवसभरात कार्यशाळेत राज्य अहवाल आणि जिल्हा अहवाल सादरीकरण करण्यात आले. तसेच डॉ. नरेंद्र दाभोलकर खून खटला निकाल अनुषंगाने चर्चा होऊन ज्या लोकांची सुटका झाली आहे त्यांच्या विरोधात उच्च न्यायालयात अपील करण्याचे देखील ठरवण्यात आले.


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ]