पाण्याने दिवा कधी पेटते का जी?

डॉ. सुनील भगत -

उमरेड येथे अंगणवाडी सेविकांचे प्रशिक्षण

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, जि. नागपूरद्वारे एकात्मिक बालविकास प्रकल्प उमरेड येथील प्रशिक्षणात पाण्याने दिवा पेटवून प्रशिक्षणाचे उदघाटन करू असे रामभाऊ डोंगरे यांनी म्हणताच पाण्याने दिवा पेटते का जी? असा प्रश्न अंगणवाडी सेविकांनी केला आणि लगेच पाण्याने दिवा पेटवून देताच सर्व अंगणवाडी सेविका आश्चर्यचकित झाल्या व प्रशिक्षणास सुरुवात झाली. जादूटोणाविरोधी कायद्याचे प्रशिक्षण देताना पोस्टर्सवर चित्रित बुवाबाजी व तांत्रिक, मांत्रिकांची भयानकतेची माहिती ऐकून मनातून क्षुब्ध झालेल्या अंगणवाडी सेविकांना जेव्हा प्रत्यक्षात चमत्कार सादरीकरण करून त्यामागील खरे वैज्ञानिक कारण सांगितले असता त्यांच्या मनातील भीती गायबच झाली.

जिल्हाधिकारी व मुख्य कार्यपालन अधिकारी नागपूर यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, नागपूर द्वारे जिल्ह्यातील सर्व तालुका स्तरावरील प्रत्येक प्रकल्पातील अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पंचायत समिती उमरेडच्या सभागृहांत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सुनीता ढाकणे एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रशिक्षणात ‘महाअंनिस’चे राज्य कार्यकारिणी सदस्य रामभाऊ डोंगरे, जिल्हा प्रधान सचिव प्रा. डॉ. सुनील भगत, जिल्हा पदाधिकारी चंद्रशेखर मेश्राम, जयप्रकाश ढोंगळे, महिला विंगच्या प्रमुख प्रिया गजभिये मंचावर उपस्थित होते. एकात्मिक बालविकास प्रकल्प उमरेडच्या अंगणवाडी सेविका कालिंदा मेंघरे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले व आरंभिक कार्यक्रमाचे संचालन पण केले.

भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन प्रा. डॉ. सुनील भगत यांनी करून जादूटोणाविरोधी कायद्याचे प्रशिक्षण कार्यशाळेला सुरुवात केली. जिल्हा प्रधान सचिव प्रा.डॉ.सुनील भगत यांनी जादूटोणाविरोधी कायदा, त्यांची कलमे व शिक्षेचे प्रावधान इत्यादी बाबींचे प्रशिक्षण प्रत्येक चित्र पोस्टरच्या आधारे केले. त्यानंतर प्रत्यक्ष चमत्कार सादरीकरण रामभाऊ डोंगरे व चंद्रशेखर मेश्राम यांनी पाण्याचा दिवा प्रकल्प अधिकारी सुनीता ढाकणे मॅडम यांचे हस्ते पेटवून प्रशिक्षणाचे उद्घाटन करताच सर्वांना आश्चर्याचा धकाच बसला. त्यानंतर, पैशाचा पाऊस पाडणे, जळती उदबत्ती आपोआप फिरवून भुताचा शोध घेणे, मंत्रोच्चाराने हवन पेटविणे, बंद लोखंडी लंगर चमत्काराने उघडणे, इ. प्रयोग सादर करून अंगणवाडी सेविकांची मने जिंकली. दरम्यान वैज्ञानिक दृष्टिकोन रुजत गेलं व महिलांनी आपले डोके चालवणे सुरू केलं. तरीही हे चमत्कार कसे घडले त्याची कारणमीमांसा व वैज्ञानिक कारण शेवटी प्रा. डॉ. सुनील भगत, रामभाऊ डोंगरे यांनी सर्वांना अवगत केले.

अंगणवाडी सेविकांनी सदर चमत्कार आपापल्या कार्यक्षेत्रात करणेचा निर्धार केला. कोणी कितीही शिकला, साधं विज्ञान विसरला या मानवी मूल्य सांगणारे गीत चंद्रशेखर मेश्राम, डॉ. सुनील भगत यांनी प्रस्तुत केले व कार्यक्रमाची सांगता झाली. सूत्रसंचालन कालिंदा मेंघरे यांनी तर दुर्गा नाईक मॅडम यांनी आभार मानले.

डॉ. सुनील भगत,

नागपूर अंनिस


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ]