सौ. प्रतिभा पद्माकर जगदाळे -

हल्ली म्हणे ही विद्वत्ता
झाली फार-फार स्वस्त
ज्याने-त्याने पाजळली
जन सारे झाले त्रस्त॥1॥
मध्ये एक कुणीतरी
छान झुंबर बांधलं
फ्रान्समध्ये ‘राफेल’ला
रीतसर ते टांगलं ॥2॥
लिंबू-मिरचीचा रंग
फार शोभून दिसला
फ्रेंच साहेब का हून
खुदकन हो हसला ॥3॥
भारताला अप्रुप ‘त्या’
लढवय्या ‘राफेल’चं!
अन् फ्रान्सला कौतुक
सुस्वरूप झुंबराचं ॥4॥
आपल्याही बुध्दीचे ते
किती नवल सांगावे
म्हणूनच तिलासुद्धा
एक झुंबर बांधावे ॥4॥
सौ. प्रतिभा पद्माकर जगदाळे, सांगली