-
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कोल्हापूर वतीने शांताबाई कांबळे (वय ७० रा. कणेरी, ता. पन्हाळा) व मालन संभाजी खामकर (रा. भोसे, ता. मिरज, जि. सांगली) यांना जटामुक्त करण्यात आले. सदर महिला अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या संपर्कात आल्या. सीमा पाटील व गीता हासूरकर यांनी या महिलांना जटा मुक्त केले, सदरचा कार्यक्रम आकार गार्डन ताराबाई पार्क येथे संपन्न झाला.
केसांची व्यवस्थित निगा न राखल्यामुळे केसांमध्ये गुंता वाढतो व जट तयार होते, जटेची जोपासना अंधश्रद्धेतून होते. जटेस कोणी हात लावत नाही, कापायला तर दूरची गोष्ट. पण समाजातील काही मंडळी सदर महिलेस जट काढण्यास प्रवृत्त करतात, विविध माध्यमांतून सीमा पाटील गीता हासूरकर यांनी महिलांचे जटा निर्मूलन केलेले व्हिडिओ मंडळी पाहत असतात. त्यातून भोसे गावातील खामकर शेतकरी कुटुंब यांनी सीमा पाटील यांना संपर्क केला व मालन खामकर जटामुक्त झाल्या.
कणेरी गावातील सेवानिवृत्त बबन कांबळे हे पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते. कोल्हापूर प्रशांत आंबी हे ऑल इंडिया स्टुडंट, भारतीय कम्युनिस्ट पक्ष कार्यकर्ते यांच्याशी संपर्क केला, तसेच सदर महिलेस जट काढण्यासाठी प्रवृत्त करण्यात आले. सदर दोन्ही महिलांचा साडी देऊन अंनिसच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी रमेश वडणगेकर, किरण गवळी, सीमा पाटील, गीता हासूरकर, रेखा सपाटे, विद्या गायकवाड, राजू संभाजी खामकर, संभाजी हरी खामकर आदी उपस्थित होते.