मुक्ता दाभोलकर -
3 ते 12 जानेवारी (सवित्रीबाई फुले जयंती ते जिजाऊ जयंती) 2022
सावित्रीबाई फुले जयंती (3 जानेवारी) ते जिजाऊ जयंती (12 जानेवारी) या कालावधीत ‘महाराष्ट्र अंनिस’च्या राज्य महिला विभागाने ‘महिला सहभाग अभियान’ आयोजित केले होते. यानिमित्ताने ‘अंनिस’च्या कामाशी अधिकाधिक महिलांना जोडून घेण्यासाठी महिला गटांसोबत संवाद किंवा व्याख्यानाचे कार्यक्रम आयोजित केले होते. डिसेंबरमध्ये औरंगाबाद जिल्ह्यात, प्रेमविवाह केलेल्या तरुणीचा तिच्या भावाने आईच्या मदतीने खून केल्याच्या पार्श्वभूमीवर ‘खोट्या प्रतिष्ठेचे बळी’ हा विषय संवादासाठी निवडण्यात आला होता. मिलिंद जोशी यांनी या विषयाच्या सोशल मीडियातील प्रसारासाठी दोन प्रभावी पोस्टर्स तयार करून दिली. मुक्ता दाभोलकर व उषा शहा यांनी या विषयावर भाषण करण्यासाठी उपयोगी पडतील, अशा मुद्द्यांचे टिपण तयार करून ते महिला विभागातील कार्यकर्त्यांसमवेत ‘शेअर’ केले.
या अभियानांतर्गत पुढील कार्यक्रम घेण्यात आले.
1) सोलापूर शाखेच्या डॉ. अस्मिता बालगावकर यांनी जिव्हाळा अपंगमति विकास संस्था येथे कार्यक्रम घेतला.
2) पेण (जि. रायगड) शाखेने जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बचत गटांशी संलग्न महिलांसमोर व्याख्यानाचे आयोजन केले होते. मीना मोरे या प्रमुख व्याख्यात्या होत्या. संदेश गायकवाड, लोकरे मॅडम, प्रा. पोरे, चंद्रहास पाटील यांनी देखील उपस्थित महिलांशी संवाद साधला.
3) सातारा शाखेच्या वतीने वर्षा पवार व विजय पवार यांच्या सहकार्याने जगताप हॉस्पिटल येथे कार्यक्रम झाला. यावेळी वंदना माने यांनी ‘खोट्या प्रतिष्ठेचे बळी’ याविषयी उपस्थितांशी संवाद साधला. तसेच दत्ताजीराव जाधव यांनी क्रांतिज्योती सवित्रिबाई फुले यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. यावेळी 20 ते 25 महिला उपस्थित होत्या.
4) सातारा शाखेच्या वंदना शिंदे यांनी आकाशवाणी परिसर, सातारा येथे बचत गटांच्या महिलांसोबत कार्यक्रम घेतला
5) रायगड जिल्ह्यातील नागोठणे शाखेने यानिमित्ताने कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या महिलांना ‘अंनिस’चे एक-एक पुस्तक भेट दिले.
6) सोलापूर शाखेच्या निशा भोसले यांनी ए. आर. बुर्ला महिला वरिष्ठ महाविद्यालयात 175 मुलींशी या विषयावर संवाद साधला. गेली अनेक वर्षे‘अंनिस’च्या कार्यकर्त्या असलेल्या निशाताई वयाच्या सत्तरीत आहेत. त्यांनी सांगितले की, आज प्रेमविवाह म्हणजेच स्वतःच्या मर्जीने विवाह ठरवणार्या मुलींचे खून हे ‘खोट्या प्रतिष्ठेचे बळी’ म्हणून ओळखले व नोंदले जातात. परंतु साठ-सत्तर वर्षांपूर्वी ग्रामीण भागात अशा मुलीचा अचानक मृत्यू होत असे, ज्याची कुठेही वाच्यता होत नसे. यावेळी ‘विवेकवाहिनी’चे उद्घाटन देखील करण्यात आले. या कार्यक्रमासाठी सोलापूर शहर शाखेचे अध्यक्ष प्रा. राजेंद्र लोखंडे, मधुरा सलवारू, धडके आदी कार्यकर्तेउपस्थित होते.
7) आमराई हायस्कूल, सोलापूर येथे निशा भोसले यांनी नववी, दहावीच्या 65 ते 70 मुलींसमोर खोट्या प्रतिष्ठेचे बळी या विषयावर व्याख्यान दिले. या कार्यक्रमासाठी सरिता मोकाशी, डॉ. सुरेश व्यवहारे व नयना व्यवहारे उपस्थित होत्या.
8) आयटीआय मुलींचे कॉलेज येथे 80 मुलींसमोर निशा भोसले यांनी व्याख्यान दिले. रोटरी क्लब, जुळे सोलापूर यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमासाठी रोटरी क्लबचे पदाधिकारी; तसेच सरिता मोकाशी, डॉ. सुरेश व्यवहारे व नयना व्यवहारे उपस्थित होत्या.
9) वसुंधरा महाविद्यालय, सोलापूर येथे मुक्ता दाभोलकर यांनी ‘अंतर्गत तक्रार निवारण’ समितीचे ऑनलाईन उद्घाटन केले. याप्रसंगी निशा भोसले यांनी पन्नास विद्यार्थिनींसमोर व्याख्यान दिले.
10) ‘म. अंनिस’ चाळीसगाव शाखा; तसेच दृष्टी फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात शमिभा पाटील यांनी ‘खोट्या प्रतिष्ठेचे बळी’ या विषयावर भाषण केले. यावेळी प्रा. किरण पाटील उपस्थित होते.
11) कोल्हापूर शाखेच्या गीता हसूरकर आणि सुजाता म्हेत्रे यांनी ‘खोट्या प्रतिष्ठेचे बळी’ या विषयावर व्याख्यान दिले.
12) वालचंद आर्ट्स आणि सायन्स कॉलेज, सोलापूर येथे मुक्ता दाभोलकर यांनी व्याख्यान दिले. यावेळी उषा शहा, अंजली नानल, मधुरा सलवारू, प्राचार्य संतोष कोटी असे 103 जण उपस्थित होते. डॉ. कोटी यांनी देखील या विषयावर मनोगत व्यक्त केले.
सोलापूर शाखेने या अभियानांतर्गत एकूण सात कार्यक्रम आयोजित केले होते.
13) रत्नागिरी शाखेच्या प्रा. सोनाली कदम यांनी प्रा. गोगटे-जोगळेकर महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या 66 विद्यार्थ्यांसमोर पीपीटी वापरून या विषयाचे सादरीकरण केले. उपस्थित मुलींनी या घटनांचा कडाडून निषेध केला. त्यांनी संगितले की, पालकांनी आपल्या मुलांच्या निर्णयावर विश्वास ठेवणे आवश्यक आहे; तसेच बाईचे परंपरेतून दिसणारे सोशिक आणि सोज्ज्वळ रूप बदलण्याची गरज आहे. कारण त्यामुळे मुली चौकटीत अडकतात.
14) परभणी शाखेच्या प्रा. डॉ. सारिका सावंत यांनी के. के. एम. महाविद्यालय, मानवत येथील प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींसमोर या विषयाची मांडणी केली. महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. एस. जे. कुकडे मॅडम कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.
12 जानेवारी रोजी या अभियानाच्या समारोपाचा ऑनलाईन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सीमा पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. मीना मोरे, सारिका सावंत, अलका जाधव, ऊर्मिला काटकर, सोनाली कदम यांनी ‘खोट्या प्रतिष्ठेचे बळी’ या विषयी संवाद साधतानाच्या स्वतःच्या अनुभवांचे व विचारांचे कथन केले. उषा शहा यांनी अभियानाचा आढावा घेऊन कार्यक्रमाचा समारोप केला. राधा वणजू यांनी आभार प्रदर्शन केले. सुनीता देवलवार व नीता सामंत यांनी संयोजनाची जबाबदारी पार पाडली.