वार्तापत्राची वेबसाईट डॉ. दाभोलकरांचा विवेकवादी विचार समाजात सर्वदूर पोचवेल – डॉ. एन. डी. पाटील

राहुल माने -

जगभरातील वाचकांपर्यंत अंधश्रद्धा निर्मूलनाचा विषय पोचवण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रा’ची वेबसाईट तयार केली आहे. 14 ऑगस्ट रोजी वेबसाईटचे लोकार्पण एका ऑनलाईन कार्यक्रमात ‘अंनिस’चे अध्यक्ष प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी माननीय सरोजताई पाटील आणि नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधाताई पाटकर यांच्या उपस्थितीत केले.

प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्यातर्फे सरोजताई पाटील यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या, माननीय एन. डी. पाटील यांच्या वतीने या वेबसाईटचे लोकार्पण झाले, असं मी जाहीर करते. या वेबसाईटमुळे डॉ. दाभोलकरांचा विवेकवादी विचार समाजात सर्वदूर पसरण्यासाठी खूप मदत होणार आहे. त्याचप्रमाणे शाळा आणि महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांपर्यंत हा विचार पोचवण्यासाठी मदत होईल. समाजामध्ये ’अंनिस’ ही संस्था प्रबोधन करते. कोणतीही संस्था उभी करणं जितकं कठीण आहे, तितकंच तिचं काम पुढे नेण्यासाठी जागृत राहणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे वेबसाईटला समोर ठेवून कार्यकर्त्यांनी चांगले काम करावे, अशी सदिच्छा त्यांनी डॉ. दाभोलकरांच्या स्मृतीला अभिवादन करत व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर उपस्थित होत्या. त्या म्हणाल्या, डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या अघोरी हत्येनंतर सर्व युवा-बुजुर्ग नेतृत्वाने व कार्यकर्त्यांनी ही चळवळ पुढे चालू ठेवली. आज अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. जातपंचायतीविरोधात डॉ. दाभोलकरांनी मोठे काम उभे केले. पण आज धर्माच्या नावावर सत्ताधीशांकडून धर्मांधता, सांप्रदायिकता आणि हिंसा पसरवली जात आहे. अशा परिस्थितीमध्ये जाती आणि धर्मांच्या अंधश्रद्धा आणि माणसाचं नातं तोडणार्‍या सर्व कारवायांचा निषेध केला पाहिजे. त्याचबरोबर समाजाचं प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे. त्यात विवेक आणि विवेकशीलता महत्त्वाची आहे, म्हणूनच डॉ. दाभोलकरांनी ’विवेकवाहिनी’ची स्थापना केली. आज ’अंनिस’ विवेकशील विचारांचा प्रसार करण्यासाठी ऑनलाईन व्हावे लागत आहे. त्याचाच एक भाग म्हणून ’अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र’ या वेबसाईटचे सर्व प्रकारच्या आंदोलनाला वेळोवेळी बळ देणार्‍या एन. डी. सरांच्या हस्ते लोकार्पण होत आहे. त्यामुळे या वेबसाईटद्वारे अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार सगळीकडे पोचण्यासाठी आणि विवेकशील विचारांचा प्रसार महाराष्ट्राच्या व देशाच्या कानाकोपर्‍यात होण्यासाठी शक्य होईल, असा विश्वास यावेळी मेधाताई यांनी व्यक्त केला.

‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रा’चे संपादक राजीव देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. सहसंपादिका मुक्ता दाभोलकर यांनी सूत्रसंचालन केले, तर व्यवस्थापकीय संपादक राहुल थोरात यांनी आभार प्रदर्शन केले. हंसराज महाले, सीमाताई पाटील, राज वैभव, हर्षल जाधव आणि अनिस कांबळे यांनी हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी मदत केली.

ही वेबसाईट तयार करण्यासाठी अंनिसचे ज्येष्ठ कार्यकर्ते दीपक गिरमे, मिलिंद सोनटक्के, सांगलीच्या व्हीसा सॉफ्टवेअरचे प्रसाद जामसांडेकर आणि सुदर्शन पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ]