प्रा. प्रविण देशमुख -
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मोत्सव महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांचा कुटुंब मेळावा आयोजित करून आनंदाने साजरा करण्यात आला. डोंबिवली येथील ‘अंनिस’चे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रा. प्रवीण देशमुख यांच्या घरी हा कुटुंब मेळावा आयोजित करण्यात आला.
सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनाच्या पूर्वसंध्येला 2 जानेवारी 2021 रोजी साजरा करण्यात आलेल्या ‘सावित्री उत्सवा’मध्ये राजकीय, कामगार आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. हा कुटुंब मेळावा होता. सावित्रीच्या लेकींनी नउवारीत नटून-थटून प्रतीकात्मक सावित्री वेशात आपल्या माईचा जन्मोत्सव साजरा केला.
सावित्रीबाई फुले यांच्या विचारक्रांतीची मशालज्योत पेटवून आणि केक कापून, गोडधोड जेवणाने संगीत, मैफलीने, ‘कॅम्प फायर’ करून, गाण्यांनी सजलेल्या या मैफिलीत सर्वांनी सहभागी होऊन सावित्रीचा उत्सव खर्या अर्थाने साजरा केला व तिच्या स्मृतींना, विचारांना उजाळा दिला.
सायंकाळी सहा वाजता दीप प्रज्वलित करून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना वंदन करण्यात आले. त्यानंतर जुन्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनानंतर सहभोजनाचा कार्यक्रम झाला व त्यानंतर चळवळीतील गीते सादर करून सावित्रीबाईंना वंदन करण्यात आले.
जेवणानंतर रंगलेल्या संगीत मैफिलीत उपस्थित जवळपास सर्वांनीच सहभाग घेतला. चळवळीतील गाणी, फिल्मी गाणी, भावगीते, कविता, गझल, वाद्यवादन विविध सादरीकरण झाले. या संगीत मैफलीचा सर्वांनी मनमुराद आनंद लुटला.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांची आठवण करून, क्रांतिकारी विचारांची ज्योत प्रज्वलित करून मशाल पेटवून तिच्या विचारांना आठवणींना उजाळा दिला व शतशः नमन केले.
या कार्यक्रमाच्या दरम्यान सामाजिक चळवळीत आयुष्य वेचलेल्या अरुण रणदिवे आणि किसन वराडे दोन मान्यवरांच्या पुस्तकांचे प्रकाशन देखील करण्यात आले. रात्री ‘कॅम्पफायर’ नंतर केक कापून, सावित्रीबाईंचा जन्मोत्सव 3 तारखेच्या पहाटेपर्यंत सुरू होता.
या कार्यक्रमात पुण्यावरून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव व मार्गदर्शक मिलिंद देशमुख सर, अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र ट्रस्टचे अरविंद पाखले, श्रीराम नलवडे सहभागी झाले होते. दापोलीहून अनिश पटवर्धन व मुक्ता दाभोलकर खास या कार्यक्रमासाठी आले होते. ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र’ या समितीच्या मुखपत्राचे संपादक राजीव देशपांडे व रेखा देशपांडे आवर्जून सहकुटुंब सहभागी झाले होते.
याच कार्यक्रमात नवनियुक्त ट्रस्टी गणेश चिंचोले यांचा सत्कार करण्यात आला. ठाणे जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने यात सहभागी झाले होते.
अंबरनाथवरून डॉ. श्यामकांत जाधव, किरण जाधव व त्यांचे सहकारी, राजू कोळी, बबन सोनवणे, प्रा. किसन वराडे, अरुण तायडे यांनी उपस्थिती दर्शवली होती. वंदनाताई शिंदे माई, अक्षिता पाटील, श्रीप्रसाद खुळे, सुरेखा देशमुख, प्रा. प्रकाश पारखे, बबन सोनवणे, नितीन शेठ, अनिता सरदार, सचिन शिर्के या ‘अंनिस’ साथीसह, अनेक मान्यवर उपस्थित होते.
‘कायद्याने वागा’ चळवळीचे अध्यक्ष व मीडिया भारत न्यूज चॅनलचे संपादक राज असरोडकर यांनी त्यादिवशी मुक्ता दाभोलकर यांच्या मुलाखतीची चित्रफीत बनवून दुसर्या दिवशी आपल्या चॅनलवर प्रसारित केली.
ज्येष्ठ पत्रकार बाबा रामटेके, लालबावटा रिक्षा युनियनचे अध्यक्ष कॉम्रेड काळू कोमास्कर, ‘कायद्याने वागा’ या लोकचळवळीचे नेते व माजी नगरसेवक राज असरोडकर, सुप्रसिद्ध कवयित्री वृषाली, बी. एम. सी. नर्सेस युनियनच्या सरचिटणीस त्रिशला कांबळे यांनी सहभाग घेतला.
लोढा हेवन पलावा परिसरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गोपीचंद कदम, तुषार मोरे, ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते बापू राऊत, डोंबिवलीतील विख्यात डेंटल सर्जन रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ. नितीन जोशी, प्रा. स्वाती वैद्य यांच्यासह अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अनेक जुने-नवे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
मा. नगरसेवक काँग्रेस पक्षाचे गटनेते उमेश बोरगावकर, मा. नगरसेवक नंदकुमार धुळे मालवणकर त्यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. मा. आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष माननीय आप्पा शिंदे यांनीही या उपक्रमाची माहिती घेऊन शुभेच्छा दिल्या. निवृत्त पीआय रवींद्र पाटील; तसेच क्राइम ब्रांचचे कल्याणजी घेटे यांनी योग्य मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या. मानपाडा पोलीस स्टेशनच्या अधिकार्यांनी या कार्यक्रमासाठी चांगले सहकार्य केले.
–प्रा. प्रवीण देशमुख, डोंबिवली
