घरातील वस्तू अचानक पेटविणारी भानामती ‘अंनिस’ने थांबवली

मधुकर अनाप -

अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रकार; देवळाली प्रवरातील रणधीर कुटुंब भयभीत.

देवळाली प्रवरा (ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) येथील एका कष्टकरी कुटुंबातील साईनाथ रणधीर यांचे घरात १५ मे २०२६ पासून गेले तीन दिवस घरातील आणि घराबाहेरील वस्तू अचानक पेट घेऊ लागल्या. या घटनेने भयभीत झालेल्या कुटुंबाने महाराष्ट्र अंनिस अहिल्यानगर जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर अनाप यांचेशी संपर्क साधला.

पेटलेल्या कोणत्याही वस्तूला स्पर्श न करता सावध राहून लक्ष देण्याविषयी त्यांना फोनवरून सांगितले. या घटनेची पोलीस स्टेशनला तक्रार देण्याविषयी सूचित केले.

१६ मे रोजी अमावस्येच्या दिवशी सकाळी दारात लिंबू मिरच्या आढळल्या. त्यामुळे हे कुटुंब अधिकच भयभीत झाले. कपाटातील त्यांच्या मुलीच्या कपड्यांनी अचानक पेट घेतला. इतर घरातील वापरातील प्लास्टिकच्या वस्तूही पेटू लागल्या. त्याबरोबरच दोरीवर वाळत घातलेले कपडे पेटले.

दोन वर्षांपूर्वी असाच प्रकार रणधीर कुटुंबीयांत झाला होता, त्या वेळी त्यांनी संपर्क केल्यानंतर मधुकर अनाप यांनी घटनास्थळी भेट दिली असता हा प्रकार थांबला होता. त्यानंतर दोन वर्षांनी हा प्रकार पुन्हा घडल्याने रणधीर कुटुंबीयांत भीतीचे वातावरण तयार झाले.

१८ मे रोजी देवळाली येथील त्यांच्या घरी भेट दिली. झालेल्या प्रकाराची बारकाईने पाहणी केली. घरातील सर्व कुटुंबीयांशी चर्चा केली. हा प्रकार आपोआप घडणारा नसून त्यामध्ये मानवी हात असतो. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही, असे सांगून त्यांना धीर दिला.

जगात कोणतीही घटना आपोआप घडत नाही त्यामागे काहीतरी कारण असते. आपोआप पेटणार्‍या वस्तू भानामतीचा प्रकार मानला जातो. परंतु यामागे वैज्ञानिक कारण असते. घरातील वस्तू किंवा कपडे पेटण्यामागे ज्वलनशील पदार्थ कारणीभूत असतो आणि हे कृत्य करणारे मानवी हात असतात.

एखाद्याला भयभीत करणे, दहशत निर्माण करणे, आपसातील वादविवाद, मतभेदाचे कारण असेल तर अशावेळी असे प्रकार केले जातात. यासाठी भोंदूगिरी करणारा तांत्रिक, मांत्रिक याची मदत घेतली जाते. त्यामुळे रणधीर कुटुंबीयांच्या बाबतीत घडलेला प्रकार अंधश्रद्धा पसरविण्याचा आहे, दहशत निर्माण करण्याचा आहे.  त्यामुळे  या घटनेकडे बारकाईने लक्ष देण्याचे मधुकर अनाप यांनी रणधीर कुटुंबीयांना सांगून त्यांच्यातील भीती दूर करण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारची कृती ही जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा असून त्याला शिक्षा होऊ शकते.

घटनास्थळी प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांना जादूटोणाविरोधी कायद्याची पुस्तिका आणि मे महिन्याचा भोंदू खरात प्रकरणाचा विशेष अंक भेट दिला.

– मधुकर अनाप,
जिल्हा कार्याध्यक्ष, महाराष्ट्र अंनिस, अहिल्यानगर. मो. ९८५०१४४७०९


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ] [ 138 ] [ 139 ] [ 140 ] [ 141 ] [ 142 ] [ 143 ]