‘चला… व्यसनाला बदनाम करूया!’

-

‘द – दुधाचा, द – दारूचा नव्हे’ हे अंनिसचे अभियान राज्यभर साजरे

३१ डिसेंबर म्हणजे वर्षाचा शेवटचा दिवस. त्या रात्री नवीन वर्षाचे स्वागत करायला अनेक समारंभ आयोजित केले जातात आणि त्यात बर्‍याचदा मद्यपानाची सोय केलेली असते. ३१ डिसेंबरलाच तरुणांपैकी अनेक जण आपल्या आयुष्यातला पहिला ग्लास घेतात. दारू पिण्याला हल्ली एक प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. ‘नवीन वर्षाचे स्वागत आणि समारंभ साजरा करणे म्हणजे ड्रिंक्स घेणे’ अशी एक नवीन घातक परंपरा होऊ पाहते आहे. या परंपरेला आळा घालण्यासाठी आणि तिला एक आरोग्यदायी पर्याय देण्यासाठी गेली पंधरा वर्षेमहाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती अनेक शाखांमार्फत ‘द – दुधाचा, दारूचा नव्हे’ हा उपक्रम राबवत आहे. या वर्षीही महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या महाराष्ट्रातील विविध शाखांनी हा उपक्रम अतिशय उत्साहाने राबविला. त्या उपक्रमाचे हे वृत्तांकन…

सातारा शहर

परिवर्तन व्यसनमुक्ती संस्थेच्या उदय चव्हाण यांनी न्यू इंग्लिश स्कूल कन्हेर, लोकमान्य विद्यामंदिर देगाव येथे व्यसनमुक्तीविषयी प्रबोधनपर कार्यक्रम केले. परिवर्तन व्यसनमुक्ती संस्थेमध्ये व्यसनमुक्त झालेल्यांचा सत्कार डॉ. प्रसन्न दाभोलकर व संस्थेच्या विश्वस्त अनघा तेंडोलकर यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी व्यसनमुक्त झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांनी व्यसनामुळे कुटुंबीयांना काय त्रास सहन करावा लागला आणि परिवर्तन संस्थेमुळे आता कसा आनंद मिळत आहे, हे सांगितले.

सायंकाळी गोल बाग, राजवाडा येथे दूध वाटप करण्यात आले. त्यावेळी प्रशांत पोतदार, हौसेराव धुमाळ, डॉ. दीपक माने, वंदना माने, सोनाली होळ, जयप्रकाश जाधव, भगवान रणदिवे उपस्थित होते. व्यसनमुक्तीच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

***

पेण, जि. रायगड

पेण शाखेच्या वतीने ‘२५ ते ३१ डिसेंबर’ या व्यसनमुक्ती सप्ताहाची सांगता ‘द दुधाचा, दारूचा नव्हे’ या उपक्रमाने करण्यात आली. त्या कार्यक्रमांतर्गत पेण शाखेने शरद पवार भवनासमोर मोफत मसाला दूध वाटप केले.

जमलेल्या लोकांना ध्वनिक्षेपकावरून व्यसनांचे दुष्परिणाम सांगणे, दारूविरोधी घोषणा करणे आणि लोकांना मोफत मसाला दूध वाटप असे कार्यक्रमाचे स्वरूप होते. दोनशेच्या आसपास लोकांनी दुधाचा आस्वाद घेतला आणि दारूपासून दूर राहण्याचा निश्चय केला. परिसरातील विक्रेते, पादचारी, वाहनचालक, अशा अनेकांपर्यंत हा महत्त्वाचा विषय पोचू शकला.

वाहतूक पोलिस, व्यायामशाळा व्यवस्थापक, निवृत्त शिक्षक, पत्रकार, अशा अनेकांनी या समाजोपयोगी उपक्रमाचे स्वागत केले आणि मनोगत व्यक्त केले. या उपक्रमात काही नवीन सभासद नोंदणीही झाली. कार्यक्रमाला महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते संदेश गायकवाड, नितीन निकम, एन. जे. पाटील, सतीश पोरे, हबीब खोत, जगदीश डंगर, कमलेश ठाकूर, चंद्रहास पाटील, अश्विनी ठाकूर, गीता भानुशाली, सावनी गोडबोले आदी उपस्थित होते.

***

नागोठणे व रोहा, जि. रायगड

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा रोहा आणि नागोठणे यांनी संयुक्तिकरित्या ‘द- दुधाचा, दारूचा नव्हे’ हा उपक्रम रोहे नगरपालिकेसमोर राबविला. यावेळी उद्घाटक म्हणून रोहा पोलिस निरीक्षक श्री. बाबरसाहेब व डॉ. फरीद चिमावकर सर (ज्येष्ठ समाजसेवक) उपस्थित होते. तसेच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे रायगड जिल्हाध्यक्ष श्री. विवेक सुभेकर सर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमात ४०० ग्लास मसाला दुधाचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम राबवण्याचा मुख्य उद्देश युवकांनी व्यसनाधीन होऊ नये, व्यसनांपासून दूर राहावे, हा होता. दरवर्षी थर्टी फर्स्ट या दिवशी मोठ-मोठ्या पार्ट्यांचे आयोजन करून दारू पिणे ही एक फॅशन झालेली आहे. आज व्यसनाकडे तरुणांचे थवेच्या-थवे वळू लागले आहेत आणि हे घातक आहे. वैज्ञानिक निष्कर्षानुसार जर १०० तरुणांनी एकाच वेळी दारूचा पहिला ग्लास ओठाला लावला, तर त्यातील १३ जण हे अट्टल व्यसनाधीन होतात व आपल्याबरोबरच आपल्या घर-परिवाराची आणि आरोग्याची या व्यसनामुळे वाताहत करून घेतात. तरुणांनी व्यसनाच्या आहारी जाऊ नये. आयुष्य हे सुंदर आहे, ते निरोगी, निर्व्यसनी राहून जगावं, हा या कार्यक्रमामागील उद्देश आहे. नंदकिशोर राक्षे, श्रीनिवास गडकरी, अनिकेत पाडसे, प्रमोद खांडेकर, नीरज म्हात्रे, सौ. पोरे मॅडम, शुभांगी सावंत मॅडम, बिलाल मोरबेकर आदी अंनिस कार्यकर्तेउपस्थित होते.

***

रहिमतपूर, जि. सातारा

‘व्यसन किती घातक असते, व्यसनांमुळे कुटुंबे संपलीत, तरुण पिढीने व्यसनांपासून लांब राहावे आणि समाजकार्यात सतत पुढे राहावे,’ असे सांगून यावेळी ‘चला.. व्यसनाला बदनाम करूया नवीन वर्षाचे स्वागत दारू नको, दूध पिऊन करूया,’ असे आवाहन मोहसीन शेख यांनी समितीमार्फत केले. या कार्यक्रमासाठी रहिमतपूरचे पोलिस पाटील दीपक नाईक यांंनी उत्स्फूर्त साथ देत मदत केली.

या वेळी शंकर कणसे, प्रवीण माने, अवनिश माने, चंद्रहार माने, शिवाजी शिंदे, कॉम्रेड सुभाष मदने, प्रा. राजू सय्यद सर, मधुकर माने, प्रा. प्रकाश बोधे सर, प्रा. भगवान माने, प्रा. केतन जाधव, सीताराम माने, तसेच नूतन कार्यकर्तेमहेश भवारी, बाळासाहेब हुडे, सिद्धनाथ माने उपस्थित होते. तसेच अश्रलेहेश्रळल अपेर्पूोीी संघटनेचे कार्यकर्ते विशाल गायकवाड आणि वेळू गावचे कार्यकर्ते उपस्थित होते.

अंबरनाथ, जि. ठाणे

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची अंबरनाथ शाखा ‘द – दुधाचा, दारूचा नव्हे’ हा उपक्रम १५ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या पंधरवड्यात साजरा करत असते. विशेष म्हणजे सातत्याने राबविण्यात येणार्‍या या उपक्रमात दारूमुळे व्यसनाधीन झालेले १० ते १२ लोक पूर्णपणे व्यसनमुक्त झाले आहेत.

या कार्यक्रमासाठी डॉ. जाधव, श्री. वराडे सर, सोनावणे सर, किरण जाधव, भारत गॅस/राणू गॅसचा स्टाफ यांनी सहभाग नोंदवला.

डोंबिवली, जि. ठाणे

डोंबिवली शाखेकडून राबवल्या जाणार्‍या ‘द-दारूचा नव्हे, दुधाचा’ या स्तुत्य उपक्रमाला शुभेच्छा देताना रामनगर पोलिस स्टेशन, डोंबिवली वाहतूक शाखेचे सीनियर पीआय उमेश गित्ते यांनी नागरिकांना वरील आवाहन केले.

“दारू पिऊन अथवा कुठलीही नशा करून नववर्षाचे स्वागत करू नका. कुठलंही व्यसन करून वाहने चालवू नका. यात तुमच्याच जीविताला धोका संभवतो. अशा वेळी वाहतूक विभागावर प्रचंड ताण पडतो,” अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली. शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या पुरोगामी विचारांच्या संकल्पनेतून राबवल्या जात असलेल्या ‘द-दारूचा नव्हे, दुधाचा’ अशा व्यसनविरोधी उपक्रमाची नितांत आवश्यकता असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. दूध वाटून व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन करत नववर्षाचे स्वागत करतानाच स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित श्री. दत्तप्रसाद दाभोलकर यांनी लिहिलेली छोटी पुस्तिका अनेक युवकांना भेट देण्यात आली.

डोंबिवली स्टेशनजवळील राजाजी पथ येथे नववर्षाच्या पूर्वसंध्येला सायंकाळी ५ ते ७ दरम्यान आयोजित केल्या गेलेल्या या उपक्रमाला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे युवकांनी आणि स्त्रियांनी यामध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून अशा उपक्रमाची नितांत आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले.

अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र ट्रस्टचे विश्वस्त श्री. गणेश चिंचोले, महाराष्ट्राचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यकारिणी सदस्य प्रा. प्रवीण देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे डोंबिवली विधानसभा कार्याध्यक्ष व माजी नगरसेवक नंदकुमार धुळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस रोहित सामंत, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील सामंत, सीपीआयचे कॉम्रेड अरुण वेळासकर, अंनिस ठाणे शाखेचे विजय मोहिते, डोंबिवली शाखेचे नितीन सेठ, उदय देशमुख, संध्या देशमुख, शशिकांत म्हात्रे, निमेश पाटील, विद्याधर राणे, एलन क्लासचे चीफ गणेश देसाई, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुनील फलदेसाई, केनेध बेबे, मंगेश जाधव आदी सहकार्‍यांनी पूर्णवेळ उपस्थिती दर्शवून, सर्व नागरिकांना व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले.

***

कवठेमहांकाळ जि. सांगली

“दारू, गुटखा, गांजा, अफू आदी व्यसनांमुळे सध्याची तरुण पिढी बरबाद होत आहे. व्यसनांमुळे अपघात व गुन्हेगारी वाढत आहे. त्यामुळे भारताला सशक्त राष्ट्रासाठी व्यसनमुक्त पिढी असणे महत्त्वाचे आहे,” असे प्रतिपादन कवठेमहांकाळ येथील पोलिस निरीक्षक शिवाजीराव करे यांनी केले. ते अंधश्रद्धा निर्मूलन समिती आयोजित व्यसनमुक्त अभियानात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कवठेमहांकाळ जुने स्टँड परिसरात अंनिस शाखेतर्फे ३१ डिसेंबर रोजी नवीन वर्षानिमित्त दूध वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी व्यसनांचे तोटे सांगून त्यापासून समाजाने दूर राहणेबाबत प्रबोधन करण्यात आले.

अंनिसचे कवठेमहांकाळ तालुकाध्यक्ष प्रा. दादासाहेब ढेरे म्हणाले, दारू आणि यांसारख्या व्यसनामुळे व्यक्तीचे शारीरिक मानसिक आणि आर्थिक नुकसान होते. दारूच्या व्यसनामुळे कुटुंबेच्या कुटुंबे उद्ध्वस्त झालेली आपण पाहत आहोत. दारूच्या आहारी जाणे हे आजारी माणसाचे लक्षण असून त्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून व्यसनमुक्ती देखील केंद्र चालवले जाते. ज्यांना दारूपासून सुटका करायची आहे, त्यांनी अंनिसशी संपर्क साधण्याची विनंती त्यांनी केली.

कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित म्हणून पोलिस निरीक्षक अक्षय ठिकणे आणि अंनिस राज्य कार्यकारिणी सदस्य फारूक गवंडी, शेतकरी कामगार पक्षाचे दिगंबर कांबळे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कार्याध्यक्ष सचिन करगणे यांनी केले. आभार सागर पाटील यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मधुकर पाटील, विक्रांत लोखंडे, प्रथमेश पाटील, वैभव कांबळे, विशाल सौंदडे, सचिन पाटील, अमोल देशिंगे आदींनी परिश्रम घेतले.

चाकण, जि. पुणे

‘चला… व्यसनाला बदनाम करू’ हा उपक्रम राबविला. यावेळी मोठ्या प्रमाणावर लोकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यावेळी ५० लिटर दूध वाटप करण्यात आले. मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली. यामध्येे तरुणाईला संदेश देताना व्यसनांपासून स्वतःला दूर ठेवून स्वतःची काळजी घ्यावी व प्रगती करावी, तसेच या चळवळीस सर्वांनी जोडून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले.

या प्रसंगी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीनशेठ गोरे, नगरसेवक, शहरप्रमुख महेशशेठ शेवकरी, सागर गोरे, शामभाऊ राक्षे, शैलेश गोरे, मयुर शेवकरी, अ‍ॅड. धनश्री गोरे, शाखेच्या कार्याध्यक्षा प्रमिला गोरे, विशाल बारवकर, अर्चना काळे, नारायण करपे, प्रमोद पारधी, नामदेव पडदुने,चंद्रकांत बुटे, संभाजी थिटे, कुसुम करपे, वैष्णवी गोरे, मधुसूदन शेवकरी, अनुष्का करपे व कलाविष्कार मंचचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नागपूर शहर

नागपूर शाखेतर्फे शहीद स्मारक १० नंबर पूल इंदोरा येथे ‘द- दुधाचा, दारूचा नव्हे’ हा उपक्रम जोरदारपणे राबविला गेला. यावेळी उद्घाटक म्हणून राज्य कार्यकारिणी सदस्य रामभाऊ डोंगरे, जिल्हा कार्याध्यक्ष चित्तरंजन चौरे सर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. आनंद मेश्राम यांनी व्यसनमुक्तीवर सुंदर व प्रभावी गीत सादर केले. पुष्पा घोडके, नीता इटनकर, वर्षा सहारे, मीनाक्षी सहारे यांनी व्यसनविरोधी घोषणा दिल्या. या कार्यक्रमात दुधाचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम राबवण्याचा मुख्य उद्देश युवकांनी व्यसनाधीन होऊ नये, व्यसनापासून दूर राहावे हा होता.

या कार्यक्रमास देवानंद बडगे, चंद्रशेखर मेश्राम, अरविंद तायडे, पोपरे मॅडम, दीपक गजभिये, कुंदन मेश्राम, अशोक राऊत, नरेश महाजन, माधुरी मेश्राम, श्वेता गजभिये, दीप्ती नाईक, सुनीता सहारे, मिलिंद गोंडाने आदी महा. अंनिस पदाधिकारी, कार्यकर्तेउपस्थित होते.

जाडरबोबलाद, ता. जत

आजची तरुण पिढी व्यसनाधीन होत चालली आहे. त्याला कोठेतरी आळा घालावा. तसेच नवीन वर्षाचे स्वागत नशेत झिंगून न करता विधायक कार्यक्रम-उपक्रम साजरे करून करावे, या उद्देशाने दि. ३१ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौक येथे ‘द-दारूचा नव्हे, दुधाचा’ हा कृतिशील उपक्रम जाडर बोबलाद अंनिसने राबविला. यावेळी सर्वांना दूध व पुस्तके वाटत व व्यसनांचे तोटे यावर प्रबोधन करत राबवण्यात आला.

यावेळी अंनिसचे सांगली जिल्हा सांस्कृतिक विभागप्रमुख संतोष गेजगे, युवानेते सदाशिव गेजगे, सांगली जिल्हा अंनिस युवा कार्यवाह रवी सांगोलकर उपस्थित होते. तसेच मयूर काटे, हुलेश बजेंत्री, महादेव बन्नेनवर, राजू ऐवळे, विठ्ठल ऐवळे, अनिल शिंगाडे व कार्यकर्तेआणि समस्त गावकरी उपस्थित होते.

पिंपरीचिंचवड

व्यसनमुक्ती अभियानांतर्गत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून १५ जानेवारीपर्यंत बाणेर, निगडी व पिंपरी-चिंचवड परिसरातील परिसरातील कॉलेजमध्ये व्यसनमुक्ती प्रबोधन कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.

या अंतर्गत २८ डिसेंबर रोजी आयुर्वेद महाविद्यालय निगडी आणि फिजियोथेरेपी कॉलेज निगडी येथे व्यसनमुक्ती प्रबोधनावर व्याख्यान देण्यात आले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि परिवर्तन ट्रस्टच्या कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. परिवर्तन ट्रस्टनिर्मित व्यसनाची सुरुवात आणि त्यांचे दुष्परिणाम सांगणारी शॉर्ट फिल्म दाखविली.

रेश्मा कचरे यांनी एखादी व्यक्ती व्यसनांकडे का ओढली जाते, हे सांगितले. हे सांगताना त्या म्हणाल्या की, केवळ गंमत किंवा आग्रह म्हणून सुरुवात होते. संपन्नता, स्वभाव, दुःखे, निराशा, रिकामपणा, संगत वगैरे अनेक कारणे यात येतात. नंतर ती व्यक्ती त्या व्यसनांवर पूर्णपणे अवलंबून राहते. संबंधित पदार्थ मिळाला नाही तर त्या व्यक्तीला मानसिक, तसेच शारीरिक त्रास होतो.

मिलिंद देशमुख यांनी सांगितलं की अशिक्षितांइतकीच सुशिक्षितांमध्येही व्यसने प्रमाण अधिक आहेत. व्यसनधीनतेकडे वळण्याची सुरुवात म्हणजे बीअर पिणे. गंमत म्हणून सुरू केलेल्या मद्यपानाचा शेवट व्यसनाधिनतेत कसा होईल हे सांगता येत नाही. म्हणून बीअर पिणे या पहिल्या पायरीलाच नकार द्या, असे त्यांनी सांगितलं. अहमदनगरचे मनोहर वायकर यांनी धूम्रपान आणि तंबाखू सेवनाचे होणारे दुष्परिणाम यांची माहिती सांगितली. तंबाखू सेवनाने होणार्‍या मुखाच्या विविध कर्करोगांची सचित्र माहिती दिली. या वेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी मद्यपान आणि धूम्रपान करणार नाही, अशी सामूहिक शपथ घेतली.

व्यसनमुक्ती हे त्या व्यक्तीसाठी, कुटुंबासाठी आणि समाजासाठी मोठेच आव्हान असते आणि चिकाटीने प्रयत्न केला तरच यात यश येऊ शकते. जेव्हा ही सवय प्राथमिक अवस्थेत असते, तेव्हा ती सोडणे सगळ्यात सोपे असते, नंतर ते अवघड होत जाते. त्यामुळे आपल्या सभोवती अशी व्यसनी व्यक्ती आढळल्यास तिला व्यसनमुक्तीसाठी प्रवृत्त करा, असे विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी आयुर्वेद महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रागिणी पाटील आणि फिजिओथेरपी कॉलेजच्या डॉ. वर्षा कुलकर्णी यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.

याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थी, अध्यापक आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्तेउपस्थित होते. अलका जाधव, अंजली इंगळे, शुभांगी घनवट, सुभाष सोळंकी, रामभाऊ नलावडे व अशोक जाधव या कार्यकर्त्यांनी नियोजनासाठी सहकार्य केले.

सोलापूर शहर

‘नो वाईन, नो बीअर, हॅप्पी न्यू इयर’ असे सांगत ‘द दारूचा नव्हे, तर दुधाचा…’ असा संदेश अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सोलापूर शाखेने दिला. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी दारूच्या पार्ट्या असतात. त्यात तरुणाई झिंगते. त्यांना व्यसनांपासून परावृत्त करण्यासाठी या अभियानास सुरुवात झाली. यंदा त्याचे पंधरावे वर्ष आहे. यंदाही त्याचा प्रारंभ झाला. डॉ. आंबेडकर चौकात महामानवाला अभिवादन करून तरुणांना मसाला दूध देण्यात आले.

सहाय्यक पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली काळे यांच्या हस्ते या उपक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी त्या म्हणाल्या, “पोलिस यंत्रणेचा ताण कमी करण्यासाठी हा उपक्रम अतिशय महत्त्वाचा आहे. ‘चला…व्यसनाला बदनाम करूया’ असे या उपक्रमाचे ब्रीद आहे. त्यापेक्षा ‘चला… नवा आदर्श घेऊ या’ असे त्याचे ब्रीद वाक्य असेल, तर अधिक परिणामकारक बदल दिसून येईल.”

यावेळी सरकारी वकील इस्माईल बेसकर यांची प्रमुख उपस्थिती होती. अंनिस शहर शाखेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. राजेंद्रसिंह लोखंडे, कार्याध्यक्ष व्ही. डी. गायकवाड, सचिव चव्हाण, राज्य कार्यकारिणी सदस्या निशा भोसले, उषा शहा, डॉ. अस्मिता बालगावकर, अ‍ॅड. सरिता मोकाशी, मधुरा सलवारू, ग्रंथमित्र कुंडलिक मोरे, नितीन अणवेकर आदी उपस्थित होते. जिव्हाळा संस्थेच्या अध्यक्षा डॉ. अस्मिता बालगावकर यांनी सूत्रसंचालन केले.

वर्धा

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वर्धा जिल्हा शाखेच्या वतीने ‘चला…व्यसनाला बदनाम करूया’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी लायन्स क्लब वर्ध्याचे डायरेक्टर डॉ. प्रवीण धाकटे व महेश दुबे (अध्यक्ष, जनवादी कामगार संघटना), महाराष्ट्र अंनिसचे वर्धा जिल्हाध्यक्ष नरेंद्रकुमार कांबळे व इतर सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गोंदिया

नववर्षाच्या स्वागतासाठी आजची पिढी ३१ डिसेंबर रोजी ‘थर्टी फर्स्ट’ साजरा करून दारू पिऊन जल्लोष करते. मात्र दारू पिऊन करण्यात येणारा हा जल्लोष कित्येकांच्या अंगलट येत असून दरवर्षी घडणार्‍या घटनांतून त्याची प्रचीती येते. म्हणूनच गोंदिया शाखेच्या वतीने यंदा ‘चला.. व्यसन बदनाम करू या’ हे अभियान राबवून दारूपासून दूर राहण्याचा संदेश देण्यात आला.

अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष अनिल गोंडारे यांच्या संकल्पनेतून हे अभियान राबविण्यात आले असून यासाठी शनिवारी (३१ डिसेंबर) रोजी एम. जी. पॅरामेडिकल कॉलेजमध्ये ‘दारू नको, दूध प्या’ हा कार्यक्रम घेण्यात आला. समाजसेविका सविता बेदरकर, लोधी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शिव नागपुरे व गोंडाणे यांच्या हस्ते दारूच्या प्रतीकात्मक राक्षसाला चपलांनी मारून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी पाहुण्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दारूच्या व्यसनाचे दुष्परिणाम यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला प्राचार्य अनसूया लिल्हारे, प्रा. दिगंबर रहांगडाले, प्रा. छाया राणा, प्रा. रामेश्वरी पटले, प्रा. आरती चौधरी, राजू रहांगडाले, योगेश्वरी ठवरे, दीक्षा रंगारी, आशिष दमाहे, वैष्णवी क्षीरसागर, विद्या तूरकर, नंदिनी पताहे, रक्षा पटले यांच्यासह मोठ्या संख्येत विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

‘दारू नको, दूध प्या’ या कार्यक्रमांतर्गत पाहुण्यांनी विद्यार्थिनींना दारूचे दुष्परिणाम सांगून दारूऐवजी शरीराला हितकारक दूध पिण्याचे आवाहन केले. त्याचप्रकारे महाविद्यालयातील विद्यार्थिनींना दुधाचे वाटप करण्यात आले.

परभणी

परभणी येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी शनिवारी (दि. ३१) सायंकाळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात सायंकाळी ५.३० ते ६.३० दरम्यान ‘चला… व्यसनाला बदनाम करू’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात सहभागी मान्यवरांच्या हस्ते सहभागी नागरिकांना दुधाचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने ‘दारू नको, दूध प्या’ असा संदेश देत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी नागरिकांना दारूचे दुष्परिणाम सांगून दारूऐवजी शरीराला हितकारक दूध पिण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी सहभागी नागरिकांना दुधाचे वाटप करण्यात आले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने मागील ३२ वर्षांपासून समाजात अंधश्रद्धा निर्मूलनाबरोबरच विवेकी विचार रुजविण्याचे काम करण्यात येते. याचाच एक भाग म्हणून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मुंजाजी कांबळे, डॉ. सुनील जाधव, डॉ. रवींद्र मानवतकर, डॉ. परमेश्वर साळवे, प्रल्हाद मोरे, डॉ. चंद्रकांत गांगुर्डे, सहादू ठोंबरे, डॉ. जगदीश नाईक आदींसह पदाधिकारी सहभागी झाले होते.

तारळे जि. सातारा

अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पुढाकार घेत ३१ डिसेंबरला सायंकाळी ‘दारू नको, दूध प्या…’ असा कृतिशील संदेश देत दूध वाटपाचा कार्यक्रम येथे केला. दरवर्षीप्रमाणे यंदाही हा कार्यक्रम उत्साहात झाला. सायंकाळी चार वाजल्यापासून सहापर्यंत दूध वाटप सुरू होते. येथील राजेमहाडिक यांच्या राजवाड्यासमोर कार्यक्रम झाला. ‘द दारूचा नाहीतर दुधाचा, दारू नको, दूध प्या…’ असा प्रबोधनपर संदेश देण्यात आला. तरुणांनी व्यसनापासून दूर राहावे, असाही संदेश यानिमित्ताने देण्यात आला. उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग मिळाला. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष विलास भांदिर्गे, ज्येष्ठ मार्गदर्शक अप्पा डफळे, सरपंच प्रकाश जाधव, सदस्य प्राणिल यादव, वजरोशीचे माजी सरपंच मधुकर साळुंखे, डी. बी. घाडगे, राजेंद्र जगधनी, लक्ष्मण पन्हाळे, शामराव सावंत आदी उपस्थित होते.

गडहिंग्लज जि. कोल्हापूर

गडहिंग्लज अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे नववर्षाच्या पार्श्वभूमीवर ‘द-दारूचा नव्हे, दुधाचा’ हा वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आला. दसरा चौकात राबवलेल्या या उपक्रमास व्यसनाला बदनाम करून विविध घोषणा देण्यात आल्या. यावेळी मसाला दुधाचे वाटपही करण्यात आले.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे महाराष्ट्रभर समाजातील वाईट चाली-रीती, रुढी, परंपरा, भानामती, जादूटोणा, व्यसनाधिनतेविरोधात वैचारिक प्रबोधन चळवळ सुरू आहे. ३१ डिसेंबर हा मद्यपान, धूम्रपान करूनच साजरा करण्याचा दिवस असा प्रघात तरुण पिढीमध्ये दिसून येत आहे. वाढती व्यसनाधिनता रोखण्यासाठी अंनिसचा प्रयत्न सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून येथील दसरा चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर ‘द दारूचा नव्हे, दुधाचा’ हा वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आला. ‘दारू पिणारे मसणात जाणार…’, ‘सिगारेट पिणार, गुटखा, तंबाखू खाणार त्याला कॅन्सर होणार…’, ‘द नव्हे दारूचा, द आहे दुधाचा’,‘प्या रे प्या दूध प्या, सोडा रे सोडा दारू सोडा,’ अशा लक्षवेधी घोषणा देण्यात आल्या.

राज्य कार्यकारिणी सदस्य प्रकाश भोईटे, जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब मुल्ला, जिल्हा समितीचे सदस्य पांडुरंग करंबेळकर, शाखा कार्याध्यक्ष प्रा. सुभाष कोरे, प्रधान सचिव अशोक मोहिते, प्रा. पी. डी. पाटील, प्रा. आशपाक मकानदार, प्रा. शिवाजी होडगे, प्रा. आप्पासाहेब कमलाकर, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष अलका भोईटे, गीता पाटील, प्रा. अश्विनी पाटील आदी उपस्थित होते. तानाजी कुरळे यांनी आभार मानले.


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ]