विनायक माळी -
पाटखळ (ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून सत्यशोधक पद्धतीने विवाह पार पडला. भारतीय सैन्य दलात सेवेत असणारे अनिल मोहन सपताळे व दीपाली सिद्राम डांगे यांचा सत्यशोधक पद्धतीने विवाह झाला. यासाठी सोलापूर शहर शाखेच्या निशाताई भोसले, सरिता मोकाशी, केदारी सुरवसे व कुंडलिक मोरे यांनी मार्गदर्शन केले व हा विवाह सोहळा थाटात पार पाडला. त्या गावातील हा पहिलाच सत्यशोधक विवाह होय. यावेळी विनायक माळी, प्रवीण माळी, गावातील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
– विनायक माळी, मंगळवेढा अंनिस