-
चि. मयंक प्रवीण देशमुख, डोंबिवली आणि चि.सौ.कां. मीनल कमलाकर ठाकूर, अलिबाग यांच्या आंतरजातीय विवाहाप्रित्यर्थ ‘स्वागत सावित्रीच्या लेकीचे’ हा सोहळा सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनी ३ जानेवारी २०२६ रोजी डोंबिवली येथे आप्त परिवार व विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी आंतरजातीय आंतरधर्मीय विवाहांना प्रोत्साहन देण्याकरिता एक लाख रुपयांचा धनादेश अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र ट्रस्टचे खजिनदार अरविंद पाखले यांच्याकडे नवदांपत्यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.
याप्रसंगी अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र ट्रस्टचे अध्यक्ष गणेश चिंचोले, सचिव दीपक गिरमे, राज्य कार्यकारिणी सदस्या अॅड. मुक्ता दाभोलकर, अनिश पटवर्धन, जगदीश संदानशिव इत्यादी मान्यवर आवर्जून उपस्थित होते.
