टीचर अम्मा

-

या शेजारच्या फोटोतील महिला अगदी साधीसुधी, सर्वसाधारण दिसतेय ना! या महिलेचे नाव आहे के. के. शैलजा… ती रसायनशास्त्रातील पदवीधारक आहे. 2004 पर्यंत एका शाळेत शिक्षिका होती, नंतर राजकारणात प्रवेश केला. आज ज्या केरळने कोरोनाच्या साथीला आपल्या राज्यात विविध उपाययोजना अमलात आणत आटोक्यात आणण्यात यश मिळविले आहे, त्या केरळच्या डाव्या सरकारात के. के. शैलजा आरोग्यमंत्री आहेत. सारा केरळ या शैलजा टीचर यांना ‘टीचर अम्मा’ नावाने ओळखतो. 2018 मध्ये केरळमध्ये आलेल्या ‘निपाह् व्हायरस’च्या साथी वेळच्या मृत्यूच्या थैमानाला रोखण्यात केरळला यश आले होते. त्यानंतर दोन वर्षांनी आलेल्या कोरोना साथीला परतवताना केरळने ज्या प्रकारे ‘केरळ मॉडेल’ उभे केले, त्याची वाखाणणी आज सार्‍या जगभरात होत आहे. हे ‘केरळ मॉडेल’ उभारण्यात आणि त्याची यशस्वी अंमलबजावणी करण्यात केरळच्या आरोग्यमंत्री शैलजा यांचा मोठा वाटा आहे. या कोरोना काळात त्या आपले कार्यालय रात्री 12 वाजता सर्व अधिकारी गेल्यानंतर सोडतात, नंतर घरात 3 वाजेपर्यंत फाईल्सचा निपटारा आणि परत सकाळी सात वाजता कार्यालयात हजर. राज्यातील अनेक लोकांकडे त्यांचा व्यक्तिगत मोबाईल नंबर आहे. त्यामुळे लोक त्यांना कोणत्याही कामासाठी थेट फोन करतात. कोणताही लवाजमा न घेता त्या एकट्याच तमाम हॉस्पिटलना भेटी देतात. प्रसिद्धीच्या झगमगाटापासून एकदम दूर. दररोज नेमाने वार्ताहर परिषद, रोजची माहिती देण्यासाठी. मी काही विशेष करत नाही, केमेस्ट्रीमधील पदवी आहे. त्यामुळे औषधे आणि जीवाणू, विषाणूंबद्दल थोडे-फार ज्ञान आहे एवढेच, बाकी सर्व हे एका व्यापक टीमचे काम आहे, असे म्हणत श्रेयापासूनही दूरच.

कोरोनाच्या महाभयंकर साथीला परतावण्याचे काम हे काही एकट्या-दुकट्या व्यक्तीचे नाही, हे तर स्पष्टच आहे. केरळची मजबूत सार्वजनिक आरोग्यव्यवस्था, तेथील जनतेची मजबूत एकता, सुशिक्षितता, आघाडीवर काम करणारे डॉक्टर, नर्सेस आणि इतर आरोग्यसेवक, सरकारी कर्मचारी यांचे अथक परिश्रम या सगळ्यांच्या वाट्याबरोबरच केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांच्या नेतृत्वाखालील राजकीय व्यवस्थेने या सर्व घटकांचे सुसूत्रपणे संघटन करत आखलेल्या धोरणांच्या गांभीर्याने केलेल्या अंमलबजावणीचा वाटा खूपच मोठा आहे.


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ]