आरतीराणी प्रजापती -

ऐका,
पाहा,
बाबासाहेब…
हे लोक तेच आहेत
जे करत होते तिरस्कार
तुमचा-माझा
ज्यांच्याशी झुंजण्यासाठी
तुम्ही तुमची झोप,
आराम,
मुलं,
पत्नी
सारं सारं गमावलंत
जे तुमचं नाव उच्चारणं देखील
वातावरण प्रदूषित करणं मानायचे
तेच लोक आता आपणांस स्पर्श करताहेत…
तिरस्कृत आदराने
झुकवित आहेत माथा
तुमच्या पायावर.
ज्यांच्या पाऊलखुणांनी
अपवित्र व्हायची भूमी
हे तेच लोक आहेत
ज्यांच्याकडे तुम्ही अंगुलीनिर्देश
करीत आहात
साधत आहात निशाणा
संविधानाने….
जातीयवाद,
ब्राह्मणवाद,
पितृसत्ताकता आणि
विषमतेविरूद्ध.
मूळ हिंदी कविता – आरतीराणी प्रजापती
मराठी अनुवाद – भरत यादव
संपर्क – 9890140500
yadavbh515gmail.com