चला उत्क्रांती समजून घेऊया! – अं.नि.स. राबवणार प्रबोधन अभियान

राहुल थोरात -

चला उत्क्रांती समजून घेवूया अभियानामध्ये काय असेल?

उत्क्रांती विषयावर शालेय मुलांच्यासाठी पुस्तिका प्रकाशित करणे.

विज्ञान शिक्षकांच्यासाठी उत्क्रांती विषयावर कार्यशाळा

NCERT ला उत्क्रांती विषय शिक्षणात समाविष्ट करण्यासाठी पत्र लिहिण्याची मोहीम.

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात उत्क्रांती विषयावर मांडणी करणार्‍या प्रशिक्षित वक्त्यांचे नेटवर्क उभे करणे.

एनसीइआरटीने दहावीच्या अभ्यासक्रमातून उक्रांतीचे विज्ञान सांगणारा भाग वगळलेला असल्याची माहिती गेल्या आठवड्यात समोर आली आहे. आनुवांशिकता आणि उत्क्रांती या विषयी दहावीच्या अभ्यासक्रमात असलेला भाग वगळून त्या जागी केवळ आनुवांशिकता एवढाच भाग ठेवलेला आहे. अभ्यासक्रमातून उत्क्रांतीचे विज्ञान वगळण्याच्याचा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती निषेध करत आहे आणि आपला निषेध कृतीतून व्यक्त करण्यासाठी महा.अंनिस ‘चला उत्क्रांती समजून घेवूया’ हे अभियान राबवणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र अंनिसचे कार्यकर्ते, डॉ. हमीद दाभोलकर, राहुल थोरात, फारुक गवंडी, मिलिंद देशमुख, अण्णा कडलास्कर यांनी पत्रकाच्याद्वारे दिली आहे.

या प्रसिद्धी पत्रकात असे नमूद केले आहे की, पृथ्वीवर जीवसृष्टीची उत्पती कशी झाली याची शास्त्रीय मांडणी उत्क्रांतीच्या सिद्धांताच्याद्वारे केली जाते. टप्प्याटप्प्याने एकपेशीय प्राणी त्यानंतर बहुपेशीय प्राणी, मानवाचे आधीच्या टप्प्यावरील माकड आणि सर्वात शेवटी मानव अशा टप्प्यांच्या मधून मानवी उत्क्रांती कशी झाली यांची शास्त्रीय माहिती यामध्ये दिली जाते. पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माण होण्याच्या मागे कोणतीही विशिष्ट शक्ती नसून उत्क्रांतीच्या प्रक्रियेतून ती झाली आहे. ही माहिती शालेय वयातील मुलांना पहिल्यांदा उत्क्रांतीच्या सिद्धांतातून होते. मानवी जीवनाच्यावर प्रभाव टाकणार्‍या अनेक अंधश्रद्धाची निर्मिती ही मानवी जीवनाचा उगम कसा झाला यांची योग्य माहिती नसल्याने होतो. त्यामुळे उत्क्रांतीचा सिद्धांत हा शालेय अभ्यासक्रमातून शिकवल्याने विद्यार्थ्यांची मानवी जीवनाच्या उत्प्पती मागे असलेल्या विज्ञानवादी भूमिकेशी तोंडओळख होते. प्रत्यक्षात सहावी, सातवीच्या विद्यार्थ्याला याविषयी प्रश्न पडू लागतात, त्यामुळे तेव्हापासून टप्प्याटप्प्याने याविषयी माहिती शालेय अभ्यास क्रमातून येणे आवश्यक आहे.

उत्क्रांतीचा सिद्धांत हा शालेय पुस्तकांच्यामधून वगळल्यामुळे मुलांच्यामध्ये विज्ञानवादी मानसिकता निर्माण होण्यात अडथळा निर्माण होणार आहे, असे देखील या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे. यामध्ये पुढे सांगितले आहे की, भारतातील आणि परदेशातील अनेक विद्यापीठांच्यामध्ये हा उत्क्रांती सिद्धांत जीवशास्त्रातील मूलभूत सिद्धांत म्हणून शिकवला जातो. उत्क्रांती याविषयी विशेष कोर्स देखील शिकवले जातात, अशा पार्श्वभूमीवर उत्क्रांतीचा सिद्धांत हा दहावीच्या अभ्यासक्रमातून वगळल्यामुळे जे विद्यार्थी दहावीनंतर विज्ञान ही शाखा घेणार नाहीत त्यांना उत्क्रांतीच्या सिद्धांताची माहिती मिळणार नाही. देशभरातील अठराशे वैद्यानिकांनी या गोष्टीला विरोध नोंदवला आहे, त्याला महाराष्ट्र अंनिस पाठिंबा देत आहे असे देखील या पत्रात नमूद केले आहे.

राहुल थोरात


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ]