कर्नाटक अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याला मंजुरी

अंनिवा -

अंधश्रद्धा निर्मूलन कायदा 2016, 17 नोव्हेंबर 2017 मध्ये भाजपचा विरोध डावलून राज्य विधानसभेत मंजूर झाला होता. या मसुद्यावर कर्नाटकच्या राज्यपालांनी सही केली आणि हा कायदा कर्नाटकात लागू झाला.

कशावर बंदी आहे?

या कायद्यात स्नान, मासिक पाळी, कोणतीही काळी जादू करणे, अमानुष कृत्य करणे आणि खजिना शोधण्यासाठी कृत्य करणे, तांत्रिक कृत्य करणे, ज्यात शारीरिक आणि लैंगिक अत्याचार, नग्न परेड, कर्मकांडाच्या नावाखाली व्यक्तीला घरातून काढणे, कर्मकांड करताना अमानुष कृत्यास प्रोत्साहित, भूतबाधेच्या बहाण्याखाली लोकांना मारहाण, चुकीची माहिती देणे आणि भूत आणि काळ्या जादूच्या बहाण्याने भीतिदायक परिस्थिती निर्माण करणे, अद्भुत शक्ती असण्याचे दावे करणे, स्वत:चे उन्नयन करणार्‍या पद्धतीचा प्रचार करणे आणि लोकांना अग्नीवरून चालण्यासाठी भाग पाडणे यासारख्या व इतर पद्धतीवर बंदी घातली आहे.

या कायद्यामध्ये जर एखाद्या व्यक्तीला अंधश्रद्धेमुळे मारले किंवा जखमी केले गेले, तर खून किंवा खुनाचा प्रयत्न केल्याचा न्यायालयात नोंदविला जाऊ शकतो. या अशा प्रकरणासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात एका दक्षता अधिकार्‍याची नेमणूक केली आहे.

कशावर बंदी नाही

कोणत्याही धार्मिक स्थळावरील प्रदक्षिणा, यात्रा, परिक्रमा, हरिकथा, कीर्तन, प्रवचन, भजन यासह कोणत्याही प्रकारची उपसना या कायद्याच्या कक्षेत येत नाही. प्राचीन कला आणि पद्धतीचे ज्ञान प्रदान करणे, मयत संतांनी केलेल्या चमत्कारांबद्दल बोलणे आणि त्यांच्यावर प्रार्थना, उपासना, पूजास्थळांवर किंवा लोकांच्या घरी धार्मिक विधी, धार्मिक उत्सव, सण, मिरवणुका, कान आणि नाकाला छेदन करणे, मुंडन करणे, अधिनियमांतर्गत मुंडन करणे, ज्योतिष आणि वास्तुशांती स्वीकारार्ह मानले जातील.