राहुल विद्या माने -
महाराष्ट्र अंनिस पुणे जिल्हा तर्फेऑनलाईन संवादमालिका संपन्न
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (पुणे जिल्हा) तर्फे ऑनलाईन संवादमालिका (12 ते 17 जून 2021) आयोजित करण्यात आली होती. वैज्ञानिक दृष्टिकोनाशी करू या मैत्री! हे या संवादमालिकेचे नाव होते. कोरोनाकाळात चुकीच्या आणि अर्धवट माहितीच्या प्रसारामुळे आपल्या समाजात अंधश्रद्धा आणि अफवांचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोनावर केंद्रित अशी संवादमालिका आयोजित करून अचूक माहिती आणि व्यापक सामाजिक हिताने ज्ञानप्रसार करणे हा यामागे हेतू होता. या ऑनलाईन संवादमालिकेला कार्यकर्त्यांचा आणि नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.
यामध्ये शनिवार, 12 जून 2021 रोजी ‘पर्यावरण व वैज्ञानिक दृष्टिकोन’ या विषयावर अनिकेत केदारी आणि मनोहर शेवकरी यांनी संवाद साधला. या सत्राचे रेकॉर्डिंग येथे उपलब्ध आहे.
दि. 13 जून 2021 रोजी ‘बुध्द धर्म आणि वैज्ञानिक दृष्टिकोन’ या विषयावर संतोष कोष्टी, अविनाश शेंबटकर, सायली महाजन आणि संजय बनसोडे यांनी अभ्यासपूर्ण मांडणी केली. या सत्राचे रेकॉर्डिंग येथे उपलब्ध आहे.
दि. 14 जून 2021 रोजी ‘कोरोनाकडे पाहण्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन’ या विषयावर डॉ. अरुण बुरांडे यांनी सखोल वैज्ञानिक विवेचन करणारे व्याख्यान दिले. या सत्राचे रेकॉर्डिंग येथे उपलब्ध आहे.
दि. 15 जून 2021 रोजी ‘जादूटोणा निवारण व सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा’ या विषयावर कायदा संबंधित मुद्द्यांबाबत अॅड. साधना बाजारे तर बुवाबाजी संबंधित बाबींवर मिलिंद देशमुख व नंदिनी जाधव यांनी मांडणी केली. या सत्राचे रेकॉर्डिंग येथे उपलब्ध आहे.
दि. 16 जून 2021 रोजी ‘तुकोबांचे अंधश्रद्धा निर्मूलनातील डोळस विचार’ या विषयावर डॉ सुहास फडतरे महाराज यांनी पारंपरिक शैलीत संवाद साधला. या सत्राचे रेकॉर्डिंग येथे उपलब्ध आहे.
दि. 17 जून 2021 रोजी ‘दहावी व बारावी नंतरचे करिअर पर्याय’ या विषयावर डॉ. राजेंद्र कांकरिया यांनी युवा आणि पालकांना मार्गदर्शन केले. या सत्राचे रेकॉर्डिंग येथे उपलब्ध आहे.
ही संवाद मालिका पार पाडण्यासाठी धनंजय कोठावळे व सविता कोठावळे (भोर), भारत विठ्ठलदास (वालचंदनगर), राहुल माने, वसंत कदम, श्रीपाल ललवाणी (सर्व पुणे), विश्वास पेंडसे, डॉ. यशोदा आपटे, सुभाष सोळंकी, श्रीराम नलावडे, संभाजी जाधव, विजय सुर्वे(सर्व पिंपरी-चिंचवड), नारायण करपे (चाकण) या सर्वांनी योगदान दिले.
– राहुल माने, पुणे