अलिबाग शाखेची त्रिदशकपूर्ती

नितीनकुमार राऊत - 9011055270

महा. अंनिस, अलिबाग शाखेचा त्रिदशकपूर्ती सोहळा 22 डिसेंबर 2019 रोजी झाला, हे सांगण्यात आनंद व अभिमान वाटतो. कारण मी महा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पहिल्या नेरे पनवेल येथील कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर केले. पनवेल येथील उल्हास ठाकूर व प्रबोध दळवी यांच्या सबळ पाठिंब्यामुळे मी 1989 मध्ये महा. अंनिस शाखा अलिबागमध्ये सुरू करू शकलो. त्यासाठी प्रा. पुरुषोत्तम गोखले यांचा महत्त्वपूर्ण पाठिंबा या प्रक्रियेस मिळाला. त्यापूर्वी आम्ही गोखले सरांच्या घरी सामाजिक कार्य करू इच्छिणारे कार्यकर्ते जमत असू, त्यातून पुढे महा.अंनिसची अलिबाग शाखा स्थापन झाली. डॉ. नरेंद्र दाभोलकर, प्रा. प. रा. आर्डे, डॉ. विद्याधर बोरकर, शुभांगी शहा, अलका जोशी, उल्हास ठाकूर, डॉ. बिपीन रणदिवे, डॉ. प्रदीप पाटकर अशा मंडळींनी तीन दिवस अलिबागमध्ये राहून कार्यकर्ते प्रशिक्षण शिबिरात मार्गदर्शन केले व पुढे महा.अंनिसचे अलिबागमधून सुरू झालेले कार्य पूर्ण रायगड जिल्हाभर पोचले. आमच्या सोबत नीलेश घरत हे सातत्याने या प्रबोधन कार्याला सुरुवातीपासून मदत करीत राहिले. प्रा. गोखलेंसोबत प्रा. जोगळेकर, शुभांगी जोगळेकर, प्रा. फुलारी, मुश्ताक घट्टे, प्रा. अविनाश ओक, डॉ. अनिल डोंगरे, प्रा. घळसासी, डॉ. अनिल पाटील वगैरे मंडळी सोबत होती. डॉ. दाभोलकरांचे अलिबागमध्ये वेगवेगळ्या उपक्रमांदरम्यान सातत्याने येणे होत असे. चमत्कार सत्यशोधन यात्रा 2013 साली अलिबाग येथे महा. अंनिस राज्य कार्यकारिणीची बैठक झाली व त्यादरम्यान जादूटोणाविरोधी कायद्याची काळी पत्रिका प्रसिद्ध झाली. 21 मे 2013 रोजी सत्यशोधकी विवाह सोहळ्यास डॉ. दाभोलकर यांची अलिबागला भेट झाली, ही त्यांची अलिबागची शेवटची भेट ठरली.

‘शोध भुताचा-बोध मनाचा’, चमत्कार सत्यशोधन यात्रा, सर्प प्रबोधन यात्रा, युवा संकल्प अभियान, व्यसनमुक्ती अभियान, नभांगण नेत्रदान, देहदान, त्वचादान, मोठमोठी प्रबोधन अभियाने अलिबाग व रायगडसह कोकणात राबवली. पुढे मी रायगड जिल्हाध्यक्ष असताना जिल्ह्यात अनेक अंनिस शाखा वाढल्या. पुढे मी राज्य सरचिटणीस बनलो व रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा या भागात महा. अंनिसचे काम करू लागलो. अलिबागमधील नागरिक शाखेस सातत्याने देणगी, वार्तापत्र वर्गणी, जाहिरात; तसेच इतर रुपाने मदत करीत राहिले. महाविद्यालये, प्राथमिक, माध्यमिक शाळा, नगरपालिका, जिल्हा परिषद, प्रशासन, शिक्षण विभाग सामाजिक वनीकरण, जे. एस. एम. कॉलेज, पी.एन.पी., चोंढी वडके कॉलेज, प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकार, फोटोग्राफर्स यांचे नेहमी महत्त्वपूर्ण सहकार्य लाभत आलेले आहे. निर्मला फुलगावकर यांचा शाखेत 16 वर्षांपूर्वी प्रवेश झाला. त्यामुळे शाखेत महिलांचे प्रमाण व त्यांचे कामातील सातत्य ही विशेष बाब ठरली आहे. शाखेत सध्या कामात महिला आघाडीवर आहेत. ज्यासाठी अलिबाग शाखा महाराष्ट्रात वैशिष्ट्यपूर्ण समजली जात आहे. याबद्दल डॉ. दाभोलकर व सध्याचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी त्यांचे वारंवार कौतुक केले आहे. महिला घेत असलेली मेहनत खूप कौतुकास्पद आहे. मात्र देणगी संकलन, वर्गणी, विविध उपक्रम राबवणे, यात अलिबाग शाखा नेहमी आघाडीवर आहे. प्राथमिक-माध्यमिक शिक्षक शिबीर, जादूटोणा व सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा कार्यशाळा, वाळीत, पीडित कुटुंबांना आधार देणे शाखा सतत करीत आहे. काही साथी या प्रवासात सोडून गेले. त्यात प्रामुख्याने काशिनाथ शिंदे, उल्हास हळदणकर, मिलिंद मुळे यांची नावे आदराने घ्यावी लागतील. एकाचे देहदान, तर दोघांचे नेत्रदान झाले. शाखा त्रिदशकपूर्ती कार्यक्रमात प्रा. पुरुषोत्तम गोखले यांचे वेगवेगळ्या क्षेत्रातील समाजसेवेचे काम व त्याचबरोबर महा. अंनिस अलिबाग शाखेच्या स्थापनेसाठी जी ठोस भूमिका घेतली, या सर्वांचा विचार करून सर्व साथींनी त्यांना शाखा त्रिदशकपूर्ती निमित्ताने शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार रायगड जिल्ह्यातील प्रथितयश मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अनिल डोंगरे यांच्या हस्ते सन्मानित केले.

सुरुवातीला 1989 ते 1992 मध्ये या कामासाठी धर्मांध शक्तींचा खूप विरोध होत असे. पुढे डॉ. दाभोलकर यांच्या प्रभावी कामामुळे या कामाला समाजमान्यता मिळाली व तुलनेने हे काम करणे सोपे झाले. अलिबाग शाखेने प्रबोधन कार्याबरोबरच भानामती, बुवाबाजी प्रकरण, वाळीत कुटुंबाची प्रकरणे कोर्टापर्यंत लढवणे अशी कामे सतत केली आहेत. या त्रिदशकपूर्ती कार्यक्रमात प्रधान सचिव संजय बनसोडे व खगोल अभ्यास डॉ. नितीन शिंदे यांची मार्गदर्शक उपस्थिती, ही ठळक वैशिष्ट्ये राहिली आहेत. या 30 वर्षांच्या प्रवासात अनेक नवीन तरुण कार्यकर्ते जोडले आहेत. हा शाखेचा यशस्वी प्रवास यापुढेही असाच जोमाने सुरू राहील, असा निर्धार याप्रसंगी सर्व शाखा कार्यकर्त्यांनी केला व विवेकाचा आवाज बुलंद करण्याचा व ‘हम होंगे कामयाब’चा संकल्प केला.


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ]