अंनिवा -
अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र ट्रस्टचे विश्वस्त आणि महाराष्ट्रातील एक प्रमुख शिक्षण तज्ज्ञ कुलगुरू राम ताकवले सर यांचे १३ मे २०२३ रोजी निधन झाले. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ स्थापन करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. शिक्षणातील नवनवीन गोष्टींचे त्यांना खूप अप्रूप होते. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्याशी त्यांचा विशेष स्नेह होता. अंनिस ट्रस्टच्या स्थापनेपासून ते विश्वस्त होते. अंधश्रद्धा निर्मूलनाचा ऑनलाईन कोर्स तयार करण्याची त्यांची इच्छा अपुरीच राहिली.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली.