अंनिवा -

आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या समाजशास्त्रज्ञ, बुद्ध, फुले, आंबेडकर, मार्क्स व स्त्रीमुक्तीवादी विचारांची, संतसाहित्य आणि वारकरी तत्त्वज्ञानाची अभ्यासपूर्ण अशी नव्या पद्धतीची मांडणी करून समाजापुढे आणणार्या ज्येष्ठ संशोधक-लेखिका, श्रमिक मुक्ती दल, स्त्रीमुक्ती चळवळ आणि परित्यक्ता स्त्रियांची चळवळ, आदिवासी चळवळीमध्ये पायाला भिंगरी लावून झपाटल्यासारखे काम करणार्या विचारवंत कार्यकर्त्या गेल ऑम्व्हेट यांचे 25 ऑगस्ट रोजी वयाच्या 81 व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्या डॉ. भारत पाटणकर यांच्या पत्नी होत.
त्यांना मअंनिसच्या वतीने भावपूर्ण आदरांजली!