संगीता श्रीकांत केंजळे - 9404667930
सत्तेचा संघर्ष हा
की दहशतवादी खुर्चीची हाव?
दडपू पाहतेय मानवतेला
जायबंदी केलंय आकाशाला ॥1॥
भय, असहाय्यता, अनिश्चितता
हवेत भरून राहिलीय
शिरजोर करणारी आरोळी
‘मज्जाव’ करून राहिलीय ॥2॥
आवळत चाललाय फास
ओढत नेतोय कुठल्या युगात?
बंदिस्त घरट्यात निस्तब्ध पाखरे
हतबल माणसांचे चिंताग्रस्त चेहरे ॥3॥
बाया-बापड्यांचे भयभीत डोळे
पाय पळताहेत वाट दिसेल तिकडे
पळताहेत जीवाच्या आकांताने
पण रुतत जाताहेत खोल.. खोल ॥4॥
अंधार्या गर्तेत, शून्यवत भविष्यात
नेमकं जायचंय कुठं?
आकाशात की पाताळात?
की शोधायचेत पुन्हा जुनेच बुरखे ॥5॥
–संगीता श्रीकांत केंजळे
गोडोली, सातारा. मो.9404667930