-
मी यातना म्हटलं,
तर सर्वांत आधी स्त्रियांपर्यंत
पोचला हा शब्द.
मी दुःख म्हटलं,
तेव्हाही सर्वांत अगोदर स्त्रियांना
स्पर्श झाला त्याचा.
मी अस्पृश्य म्हटलं,
त्यामध्येही स्त्रिया
सहभागी झाल्या
मी प्रभुत्व म्हटलं,
स्त्रियाच विचलित
झाल्या ते ऐकून
सर्वांच्या आधी.
मी म्हटलं धोका
कुठल्याही स्त्रीने
आश्चर्य व्यक्त
नाही केले तेव्हा.
मी एका मागोमाग एक
आयुष्यातल्या संकटांना
व्यक्त केलं आणि
सर्वांमध्ये सर्वांत
आधी स्त्रियांनीच
ग्रहण केले त्यांचे अर्थ.
आणि सर्वांत शेवटी सृजन म्हटलं,
तर
स्त्रियांनीच घेतलं दत्तक
अवघ्या जगाला.
मूळ हिंदी कविता : अमित एस. परिहार
अनुवाद : भरत यादव