डॉ. सौ. शुभांगी ग. गादेगावकर - 9619536441
लिंबू-मिरची टांगा दाराला
नजर लागणार नाही घराला
झपाटलं-झपाटलं या अंधश्रद्धेने झपाटलं ॥धृ॥
लिंबू-मिरचीचं करून लोणचं
करा जेवण तुम्ही चवीचं
झटकलं-झटकलं या अंधश्रद्धेला झटकलं ॥1॥
कामी निघालो नटून-थटून
काळी मांजर आडवी समोरून
भूतदया असू द्या मनी
वाटतील सर्व जीव मग गुणी
झटकलं-झटकलं या अंधश्रद्धेला झटकलं ॥2॥
लिंबाला कुंकू फासून
बला बाहेरची टाकू फुंकून
बहुगुणी हा लिंबू
पाचकता ठेवील काबू
झटकलं-झटकलं या अंधश्रद्धेला झटकलं ॥3॥
विधवेचे झाले दर्शन
कामात येईल व्यत्यय
विधवेला समजा आपले
द्या मानवतेचा प्रत्यय
झटकलं-झटकलं या अंधश्रद्धेला झटकलं ॥4॥
दृष्टी निकोप तुम्ही ठेवा
रोप सद्भावनेचं लावा
चिकटू नका चाली रूढींना
गमवू नका येत्या सुखांना
झटकलं-झटकलं या अंधश्रद्धेला झटकलं ॥5॥
– डॉ. सौ. शुभांगी ग. गादेगावकर
मीरा रोड, ठाणे. मो. 9619536441