कोकणातील एका कुटुंबावरील बहिष्कार अंनिसच्या प्रबोधनातून मागे

प्रशांत पोतदार -

सामंजस्याने सामाजिक बहिष्कार मागे

बेनिखुर्द, ता. लांजा, जि. रत्नागिरी गावातील पंचांचा स्वागतार्ह निर्णय

बेनिखुर्द, ता. लांजा, जि. रत्नागिरी येथील भगवान परशुराम निवदेकर कुटुंबीयांना 15 जून, 2022 पासून त्यांच्या मुलीचे लग्न परराज्यातील (ता. पालमपूर, जिल्हा कांगडा, हिमाचल प्रदेश) येथील मुलाशी केले. त्याचे आमंत्रण देवाला व भावकीला दिले नाही, भावकीच्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होत नाहीत म्हणून धार्मिक कार्यक्रमाची वर्गणी घेऊ नये व त्यास परंपरेने देण्यात येणारा राखणेचा प्रसाद देऊ नये; तसेच कोणत्याही धार्मिक कार्यक्रमास सहभागी करून घेऊ नये, असा ठराव जात पंचांनी मांडला आणि त्यांना सामाजिक बहिष्कृत केले, अशी लेखी तक्रार निवदेकर यांनी 25 जुलै, 2022 रोजी लांजा (जि. रत्नागिरी) पोलिस स्टेशनमध्ये केली होती. तिची प्रत ‘महाराष्ट्र अंनिस’ (पुणे) यांनाही दिली होती. याची गंभीर दखल घेत, पुणे ‘अंनिस’ राज्य कार्यकारिणी सदस्य नंदिनी जाधव, प्रशांत पोतदार (सातारा), विनोद वायंगणकर (रत्नागिरी) व ‘अंनिस’ कार्यकर्ते नितीन हांडे (पुणे) यांनी तक्रारदारासह लांजा पोलिस स्टेशन गाठले.

संबंधित तक्रारीअन्वये धार्मिक कार्यक्रमात जात पंचांनी मीटिंग घेऊन ठराव करणे व सामाजिक बहिष्कृत करणे, हा सामाजिक बहिष्कारविरोधी कायद्यान्वये गुन्हा असून याबाबत सर्व पंचांना बोलावून घेऊन चर्चा करावी व हा बहिष्कार मागे घ्यावा, अशी विनंती ‘अंनिस’च्या शिष्टमंडळाने वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री. दादासाहेब घुडूकडे यांना केली. त्यांनी याबाबत हेडकॉन्स्टेबल बी. एस. रेवणे व आर. ए. कांबळे यांना योग्य ती दखल घेऊन कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. श्री. रेवणे यांनी या चारही पंचांना फोन करून त्वरित पोलिस स्टेशनला हजर राहण्याचे आदेश दिले. त्यापैकी पंच 1- यशवंत सखाराम निवदेकर 2- चंद्रकांत सोना निवदेकर 3- शांताराम नारायण निवदेकर हे तासाभरात हजर झाले. श्रीपत अंतू निवदेकर हे चौथे पंच मुंबईला असल्याने ते हजर राहू शकले नाहीत. त्यांना रविवारी, 14 ऑगस्ट, 2022 ला हजर राहण्याचे आदेश दिले.

आपण सामाजिक बहिष्कारविरोधी कायद्याचा भंग करून गुन्हा करीत आहात, याची जाणीव बैठकीत पंचांना करून दिली आणि संपूर्ण कायदा समजावून सांगून ‘अंनिस’ पदाधिकार्‍यांनी करून दिली. आपण सामंजस्याने गुन्हा कबूल करून यापुढे अशा स्वरुपाचा बहिष्कार टाकला जाणार नाही व कोणत्याही स्वरुपाचे निर्बंध पंच म्हणून मीटिंग घेऊन कायदा हातात घेणार नाही, असा लेखी जबाब सर्वांसमक्ष पोलिस स्टेशनमध्ये दिल्यास गुन्हा नोंद न करता आपणास समज देण्यात येईल.

या गुन्ह्याचे स्वरूप पंचांच्या लक्षात आले आणि त्यांनी यापुढे असे होणार नाही, याची लेखी ग्वाही जबाबाद्वारे पोलिस स्टेशन मध्ये लिहून दिली. या सर्व चर्चेमध्ये संबंधित पंचांची मीटिंग घेऊन सर्व गावकर्‍यांसह सामाजिक बहिष्कार टाकणेविरोधी कायदा समजून घेण्यासाठी प्रबोधनपर कार्यक्रमही गावात लवकरच घेण्याचे सर्वांनी मान्य केले.

अशा प्रकारे जातपंच महाराष्ट्रात कोठेही बेकायदेशीरपणे मीटिंग घेऊन, जाचक अटी लावून कोणालाही बहिष्कृत करत असतील तर अशा पीडित व्यक्तींनी निर्भयपणे ‘म.अंनिस’कडे अथवा नजीकच्या पोलिस स्टेशनमध्ये तक्रार करावी, असे आवाहन ‘म.अंनिस’ने केले आहे.

प्रशांत पोतदार, सातारा


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ]