अंनिवा -
भुईंज पोलिसांत गुन्हा दाखल; मांत्रिक पसार
वाई तालुक्यातील सुरूर येथील एका अल्पवयीन मुलीला स्मशानभूमीत पुजण्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने एकच खळबळ माजली आहे. हा प्रकार पुण्यातील मांत्रिक व मुलीच्या नातेवाईकांकडून घडला आहे. सातारा – वाई तालुक्यातील सुरूर येथील अल्पवयीन मुलीला स्मशानभूमीत पुजण्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने एकच खळबळ माजली आहे. हा प्रकार पुण्यातील मांत्रिक व मुलीच्या नातेवाईकांकडून घडला आहे. दरम्यान, हा प्रकार स्थानिक युवकांच्या निदर्शनास येताच मांत्रिकासह अल्पवयीन मुलगी आणि तिचे नातेवाईक बेपत्ता झाले आहेत.
‘व्हायरल’ व्हिडिओमुळे खळबळ
घटनास्थळी वाईच्या पोलीस उपाधीक्षक डॉ. शीतल जानवे-खराडे यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या आहेत. वाई तालुक्यातील सुरूर गावाच्या स्मशानभूमीच्या कट्ट्यावर मुलीच्या मांडीवर कोंबडा देऊन मांत्रिकाने पूजन केल्याचा व्हिडिओ ‘व्हायरल’ झाल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. त्यावेळी तिच्यासमोर विविध साहित्य मांडल्याचे दिसत होते. त्यावेळी तिथे गेलेल्या स्थानिक तरुणांना, ‘तिला त्रास होत होता म्हणून हे करत आहे; फक्त कोंबडा मारून नेणार आहोत,’ असं एका महिलेने सांगितले. हा प्रकार युवकांच्या निदर्शनास येताच मांत्रिकासह अल्पवयीन मुलगी आणि तिचे नातेवाईक बेपत्ता झाले आहेत.
भुईंज पोलिसांत गुन्हा दाखल
अल्पवयीन मुलीच्या स्मशानभूमीत पूजनामुळे चर्चेला उधाण आले आहे. वाई तालुक्यातील सुरूर गावाच्या स्मशानभूमीतील घटनेवर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला आहे. याप्रकरणी भुईंज (ता. वाई) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून संशयितांना पकडण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक आशिष कांबळे करत आहेत.
‘अंनिस’ची मागणी ः अल्पवयीन मुलीला ‘बाहेरची बाधा’ झाली, असे समजून अघोरी पूजा घालण्यास भाग पाडणार्या मांत्रिकाचा पोलिसांनी त्वरित शोध घ्यावा. संबंधितांवर जादूटोणाविरोधी कायद्याच्या कलमानुसार गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सातारा जिल्हा ‘अंनिस’च्या वतीने डॉ. हमीद दाभोलकर, प्रशांत पोतदार यांनी केली.