-
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची कार्यकर्ता जोडण्याची व टिकवण्याची विशेष हातोटी होती. कार्यकर्त्यांच्या अडचणीच्या वेळी नेत्यांनी कुटुंबियांना आधार देणे अत्यंत गरजेचे असते. ते डॉ. दाभोलकर नेहमी करत असत. म्हणूनच अंनिसचे संघटन राज्यभर वाढले होते. सोलापूर अंनिसचे एक जुने लढाऊ कार्यकर्ते दादा चांदणे (सध्या रा. जयपूर राजस्थान) यांच्या पत्नी सौ. चांदणे यांना डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी लिहिलेले हे एक जुने पत्र…
सन 1995 साली सत्य साई बाबा विरोधी भूमिका सर्वप्रथम दादा चांदणे यांनी घेतली होती. त्यावेळी त्यांना प्रचंड धमक्या मिळाल्या होत्या. तेव्हा सौ. चांदणे यांना आधार देणे साठी डॉ. दाभोलकरांनी हे एक सुंदर पत्र लिहले होते.
