मंदिरातील अशास्त्रीय सर्पदंश उपचार बंद करा : रायगड अंनिसची मागणी

मोहन भोईर -

नागोठणे पोलीस ठाण्याच्या कार्मक्षेत्रातील आमडोशी, ता. रोहा मेथील माणकेश्वर मंदिरात साप चावलेली व्यक्ती ठणठणीत बरी झाल्याची बातमी दै. ‘वादळवारा’ या वर्तमानपत्रात दि. 27 जुलै रोजी प्रसिद्ध झाली होती. दि. 23 रोजी आमडोशी या गावातील श्रीमती सुनीता रघुनाथ कामथे ही महिला व त्यापूर्वी सुकेळी इंदरदेव या आदिवासीवाडीतील व्यक्ती मंदिरातून सर्पदंशाचे विष उतरवून गेल्याची माहिती भोपी रामदास रामजी खरीवाले यांनी पत्रकारांना दिल्याचे या बातमीत म्हटले आहे. तसेच आमडोशी गावातील ग्रामस्थ, ह.भ.प. गजानन महाराज बलकावडे व केशव भोसले यांच्या म्हणण्याप्रमाणे एखाद्या व्मक्तीस सर्पदंश झाल्यावर श्री माणकेश्वर महाराजांच्या मूर्तीसमोर बसवून पूजा-अर्चा करून कौल लावला जातो. जर कौल डाव्या बाजूने दिला, तर विष पूर्ण उतरलेले नसते व उजव्या बाजूने दिला तर विष पूर्ण उतरले गेलेले असते, असेही या बातमीत पुढे म्हटले आहे.

बातमीत केलेले दावे हे अवैज्ञानिक व बेकायदेशीर आहेत. त्यामुळे ही बातमी वाचून सर्पदंश झालेली व्यक्ती वा तिचे हितचिंतक, नातेवाईक तिला योग्य वैद्यकीय उपचारांपासून परावृत्त होऊन उपरोक्त ठिकाणी जाण्यास प्रवृत्त होईल. त्यामुळे संबंधिताच्या जीवितास धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही; तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम, 2013 कलम 2 (1) ख, अनुसूची-8 मध्ये वर्णन केल्याप्रमाणे कलम 3 (1) अन्वये कुत्रा, साप किंवा विंचू चावल्यास एखाद्या व्यक्तीला वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखून किंवा प्रतिबंध करून, त्याऐवजी मंत्र-तंत्र, गंडेदोरे किंवा यांसारखे उपचार करणे हा दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा आहे.

या बातमीची दखल घेऊन जादूटोणाविरोधी कायद्यातील कलम 5 (1), 5 (2) नुसार दक्षता अधिकारी म्हणून स्वतः पुढाकार घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, असे निवेदन महाराष्ट्र अंनिस, शाखा नागोठणे तर्फे पोलीस निरीक्षक घुटुकडे यांच्याकडे दिले. मावेळी ‘मअंनिस’चे रायगड जिल्हाध्यक्ष विवेक सुभेकर, जिल्हा कार्माध्यक्ष मोहन भोईर, नागोठणे शाखाध्यक्ष नरेश पाटील, शाखा कार्माध्यक्ष विजया चव्हाण, युवा कार्यकर्ती वैदेही चव्हाण आदी उपस्थित होते.

यावेळी कार्यकर्त्यांनी नागोठणे विभागात सर्पदंशानंतर या प्रकारच्या अवैज्ञानिक उपचारांमुळे अनेकांना जीव गमवावा लागल्याच्या घटनांची माहिती पोलीस निरीक्षकांना दिली. तसेच याबाबत सामाजिक प्रबोधनासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सर्व प्रकारची मदत करेल, अशी ग्वाही ‘अंनिस’ कार्मकर्त्यांनी दिली. पोलीस निरीक्षक घुटुकडे यांनी योग्य ती कार्यवाहीचे आश्वासन दिले.


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ]