रमेश वडणगेकर -

कोल्हापूरच्या राजेंद्रनगर येथील दोन सख्ख्या बहिणींचा संदीप सनी कंजारभाट, सुमरजित सनी कंजारभाट यांच्याबरोबर विवाह 27 नोव्हेंबर 2020 रोजी झाला. पुढे तीन दिवसांनी जेवणाचं निमित्त करून घरी बोलावलं. या मुलींची कौमार्य चाचणी केली. या चाचणीमध्ये एक मुलगी नापास झाल्याने गेल्यामुळे ही मुलगी चांगल्या वळणाची नाही, असा आरोप मुलाच्या आईने केला व दोन्ही मुलींना माहेरी पाठवले. त्यानंतर 28 फेब्रुवारी 2021 रोजी जातपंचायत बसून या मुलींना सोडपत्र दिले. कंजारभाट समाजाच्या कौमार्यासारख्या वाईट प्रथांमुळे या मुलींचा मानसिक व शारीरिक त्रास झाला; तसेच देशात कायद्याचे राज्य असताना समांतर न्यायव्यवस्था अजूनही सुरू आहे. समांतर न्यायव्यवस्था चालवणार्यासंदर्भात समाजातील व्यक्तीवर गुन्हे दाखल व्हावेत. याप्रकरणी आठजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच संदीप सनी कंजारभाट (वय 25, रा. हनुमाननगर, बेळगाव) यास अटक करण्यात आली. यासंदर्भात पीडित मुलीस ‘महाराष्ट्र अंनिस’चे कार्यकर्ते सुजाता म्हेत्रे, सीमा पाटील, गीता हासुरकर, रमेश वडणगेकर, प्रधान सचिव दिलीप कांबळे यांनी सहकार्य केल. कोल्हापूर उप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, राजारामपुरी पोलीस निरीक्षक डुगल यांनी सहकार्य केले.
बाभळीच्या काड्या अन् काडीमोड
जातपंचायतीने पीडित मुली व संशयित दोघा आरोपींसह त्यांची आई यांच्यासमोर बाभळीच्या पाच काड्या समोर ठेवल्या. त्या एकमेकांवर पाच वेळा मारून त्या मुलींवरून उतरून दोन्ही बाजूला टाकल्या, झाले काडीमोड. अशी जातपंचायतीची प्रथा असल्याचे पीडितांनी सांगितले.
-रमेश वडणगेकर, कोल्हापूर