मुंजाजी कांबळे -
‘बार्टी’ हिंगोलीतर्फे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ‘अंधश्रद्धा निर्मूलन व चमत्कार सादरीकरण’ याविषयी आयोजित केलेल्या ऑनलाईन कार्यक्रमात प्रमुख वक्ते व चमत्कार सादरकर्ते इंजि. सम्राट हाटकर म्हणाले की, जगामध्ये कोणालाही चमत्कार करता येत नाही. विज्ञानाचा आधार घेऊन अवैज्ञानिक दावा करणारे बुवा, बाबा, महाराज जनतेच्या आगतिकतेचा व अज्ञानाचा गैरफायदा घेऊन जनतेला लुबाडत असतात. ते पुढे असेही म्हणाले, की तथाकथित चमत्कार ही तर भौतिक प्रक्रिया असते, रासायनिक प्रक्रिया असते, एखादी यांत्रिकी स्वरुपाची यंत्रणा असते किंवा हातचलाखी असे काहीतरी असते. त्याला दैवी शक्तीचा टेकू दिल्यामुळे लोक शंका घेण्यास घाबरतात म्हणून प्रश्न विचारत नाहीत.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘बार्टी’चे प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ गोवंदे होते. ते आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, की ‘बार्टी’च्या अंतर्गत समतादूत प्रकल्पाची स्थापना समाजप्रबोधनासाठीच झाली आहे. सामाजिक विभागाच्या विविध योजनांचा प्रचार, प्रसार करण्याबरोबरच संबंधित योजनांचा लाभ लोकांना मिळवून देण्यासाठी समतादूत सतत कार्यरत असतात.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुनाथ गाडेकर यांनी केले. आभार प्रदर्शन मिलिंद आळणे यांनी केले.
या ऑनलाईन कार्यक्रमामध्ये ‘बार्टी’ जालनाचे प्रकल्प अधिकारी मुंजाजी कांबळे, पार्डी बागलचे सरपंच प्रकाश मगरे, खांडेगाव ग्रामपंचायत सदस्य सुरेश कुसळे, ‘अंनिस’चे शिवाजी पिटलेवाड, कमलाकर जमदाडे, इंजि. विजया मुखेडकर उषा गैनवाड मॅडम, प्रकाश पाईकराव सहभागी झाले.
– मुंजाजी कांबळे, परभणी