-
देव कणाकणात वसलेला नाही
त्या गल्लीत देव राहात नाहीये,
ज्या गल्लीतून जाते एकटी मुलगी…
देव सुंबाल्या करतो तेथून
जिथे बलात्कार होतो..
फळे विकणार्या बारा वर्षांच्या
चिमुरडीजवळ
देव नसतो,
अग्नीसमक्ष सप्तपदी चालतात
नववधू
परंतु…
जिथे हुंड्यापायी जाळल्या जातात
सुना
‘अग्निदेवता’ तिथे असत नाहीत..
देव आंधळा आहे,
बहिरा आहे
स्त्रियांच्या सद्यःस्थितीकरिता…
पुरुषसत्ताकतेसह
तथाकथित देवदेखील
अपराधी आहे.
मूळ हिंदी कविता : रुपेश चौरासिया
अनुवाद : भरत यादव
