महाराष्ट्र अंनिस अहिल्यानगर शहर कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग संपन्न…

मधुकर अनाप -

शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, अहिल्यानगर शहर शाखेचे दि. ३० व ३१ मे २०२६ रोजी अहिल्यानगर येथे प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले.

जिल्हाध्यक्ष अरुण कडू पाटील व कार्याध्यक्ष मधुकर अनाप यांचे प्रयत्नातून व प्रमुख उपस्थितीत विविध क्षेत्रातील ५० हून अधिक कार्यकर्ते या प्रशिक्षणासाठी उपस्थित होते.

महाराष्ट्र अंनिसचे ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ. अस्मिता बालगावकर, रमेश माने, चंद्रकांत ऊळेकर, हेमंत धानोरकर यांचेसह मधुकर अनाप यांनी प्रशिक्षण वर्गाला मार्गदर्शन केले.

पाण्याचा दिवा पेटवून प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. 

जिल्हाध्यक्ष अरुण कडू-पाटील यांनी अंनिस चळवळीत सहभागी झाल्याबद्दल उपस्थित प्रशिक्षणार्थींचे अभिनंदन केले. सध्या वाढत असलेली बुवाबाजी, अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी, परंपरा ही  चिंतेची बाब आहे. त्यामुळे आपण सर्वांनी या सामाजिक कार्यात अधिक जोमाने काम करावे, असे आवाहन  केले.

दोन दिवसांच्या प्रशिक्षणात प्रशिक्षणामागील भूमिका, कार्यकर्त्यांची आचारसंहिता, महाराष्ट्र अंनिसचे विविध उपक्रम या विषयावर मधुकर अनाप यांनी मार्गदर्शन केले.

मन, मनाचे आजार व अंधश्रद्धा, स्त्रिया आणि अंधश्रद्धा या विषयावर डॉ. अस्मिता बालगावकर यांनी मार्गदर्शन केले.

संत, समाजसुधारक आणि अंधश्रद्धा निर्मूलन, शाखेची रचना व शाखा कशी चालवावी, बुवाबाजी मागील वैचारिक भूमिका या विषयावर रमेश माने यांनी विस्तृत प्रमाणात दाखले देऊन  मार्गदर्शन केले.

वैज्ञानिक दृष्टिकोन, खगोलशास्त्र आणि ज्योतिष शास्त्रातील फोलपणा या विषयावर हेमंत धानोरकर यांनी अतिशय प्रभावीपणे मांडणी केली.

श्रद्धा-अंधश्रद्धा, जादूटोणा व सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्याविषयी चंद्रकांत उळेकर यांनी मार्गदर्शन केले.

जगात कोणीही चमत्कार करू शकत नाही त्यामागे वैज्ञानिक कारण किंवा हातचलाखी असते. त्यामुळे कोणीही भोंदूगिरीला बळी पडू नये, असे आवाहन करून चमत्कारा मागील विज्ञानाचे प्रयोग प्रशिक्षणार्थींना दाखवून ते कसे करावेत व काय काळजी घ्यावी याविषयीचे मार्गदर्शन प्रमुख मार्गदर्शकांनी केले.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यकारिणी सदस्य व मानसोपचार तज्ज्ञ डॉ. हमीद दाभोलकर यांनी ऑनलाइन उपस्थितांशी संवाद साधून उपस्थितांना संबोधित केले.

चळवळीतील विविध प्रेरणादायी गीत गायनाने दोन्ही दिवस प्रशिक्षण वर्गामध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले.

प्रशिक्षण वर्गाला रयत शिक्षण संस्थेचे विद्यमान उपाध्यक्ष, अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व अहिल्यानगर जिल्हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष अरुण कडू-पाटील, रयतचे उत्तर विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे, सहायक विभागीय अधिकारी प्रमोद तोरणे, कार्यालय प्रमुख भाऊ पांडुळे, रमेश भाऊ शिंदे अशा विविध मान्यवरांनी भेट दिली.

प्रा. सोनाली शिंदे, नलिनी गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. प्रशिक्षणार्थींच्या वतीने राजेंद्र कर्डिले, अ‍ॅड. विद्या शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शहराध्यक्ष, संतोष कदम, कार्याध्यक्ष राजेंद्र कर्डिले, बुवाबाजी संघर्ष विभाग प्रमुख नलिनी गायकवाड, प्रशिक्षण विभाग प्रमुख हरेश्वर साळवे, दिलीप जगताप, रमेश भांड, संतोष पालघडमल आदींनी विशेष परिश्रम घेतले.

‘हम होंगे कामयाब’ हे सामूहिक गीत गायन करून कार्यक्रमाची सांगता झाली. शहर कार्याध्यक्ष राजेंद्र कर्डिले यांनी उपस्थितांचे आभार मानले.


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ] [ 138 ] [ 139 ] [ 140 ] [ 141 ] [ 142 ] [ 143 ]