‘कुर्बानीचा अर्थ नवा’ या अभियानांतर्गत रक्तदान करून ईद साजरी…

-

अंधश्रद्धा निर्मूलन समिती सातारा आणि मुस्लीम सत्यशोधक मंडळाचा अभिनव उपक्रम!

सर्व धार्मिक आणि उत्सवांना अधिक मानवकेंद्री स्वरूप देण्याच्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या भूमिकेला धरून, गेली दहा वर्षे चालणार्‍या ‘कुर्बानीचा अर्थ नवा’ या अभियानंंतर्गत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि मुस्लीम सत्यशोधक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी काल सातारा इथे रक्तदान करून ईद साजरी केली.

या वेळी उपक्रमाची पार्श्वभूमी सांगताना अंनिस कार्यकर्ते मोहसीन शेख म्हणाले की, “ईद उल अजहा हा कुर्बानी देण्याचा सण आहे. आपल्याला प्रिय गोष्ट कुर्बान करणे हा त्याचा खरा अर्थ आहे. बोकडाला बळी देऊन हा सण साजरा करण्यापेक्षा रक्तदान करून सण साजरा करणे जास्त विधायक पर्याय आहे. मला हा विचार पटल्याने मी गेली दहा वर्षे अंनिस कार्यकर्ता म्हणून ईद हा सण रक्तदान करून साजरा करत आहे. त्याला मुस्लीमधर्मीयांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे, ही स्वागतार्ह बाब आहे.

या वेळी बोलताना अंनिसचे कार्यकर्ते डॉ. हमीद दाभोलकर म्हणाले की, अंनिस फटाकेमुक्त दिवाळी, पर्यावरण पूरक होळी, पर्यावरणपूरक गणपती अशा अनेक सणांना अधिक मानवी चेहरा देण्याच्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी सुरू केलेल्या प्रयत्नांना सुरुवातीला विरोध झाला असला, तरी आता महाराष्ट्र शासनाने तसेच समाजमनाने देखील हे उपक्रम मोठ्या प्रमाणात स्वीकारले आहेत. त्याच पद्धतीने ‘कुर्बानीचा अर्थ नवा’ ह्या उपक्रमाला देखील वाढता प्रतिसाद मिळत आहे. हे खूप आश्वासक आहे. पैगंबर शेख सारखे तरुण कार्यकर्ते मुस्लिम सुधारणा मंडळाच्यामार्फत बोकडाची कुर्बानी देण्याऐवजी आर्थिक कुर्बानी हा उपक्रम राबवत आहे आणि त्याला चांगला पाठिंबा मिळत आहे. हे चांगले आहे.

डॉ. दाभोलकर पुढे म्हणाले की, माणूस हा मिश्रहारी प्राणी असल्याने अंनिस संघटनेचा विरोध हा मांसाहाराला नसून देवाच्या नावाने बळी देणे ह्या संकल्पनेला आहे.

आज दोन्ही संघटनांच्या वतीने मिळून २३ जणांनी रक्तदान केले. त्यामध्ये मोहसीन शेख, अलीम बागवान, जमीर शेख, मिनाज शेख, सलीम मुलाणी, नजीम इनामदार, इनुसभाई मुलानी, हमीद शेख यांच्यासोबतच अंनिसचे वतीने डॉ. हमीद दाभोलकर, प्रशांत पोतदार, उदय चव्हाण, शामली माने, सिद्धांत वरुटे, संजय दुपटे, अक्षय सपकाळ, बाळासाहेब जाधव, प्रकाश टोळे, विजय जाधव, राजेश पुराणिक, दशरथ रणदिवे, प्रदीप झनकर, अंतू भंडलकर इत्यादी कार्यकर्त्यांनी रक्तदान केले.

माउली ब्लड बँकेचे अजित कुबेर यांनी सर्व रक्तदात्यांचे अभिनंदन केले व आभार मानले. सध्या रक्ताचा तुटवडा जाणवत असताना झालेल्या या रक्तदानाचा गरजू लोकांना फायदा होईल असे विचार माउली ब्लड बँकेचे डॉ. गिरीश पेंढारकर यांनी व्यक्त केले.

या वेळी माउली रक्तपेढीचे डॉक्टर रमण भट्टड, रवींद्र भागवत, रामचंद्र मोरे, भाग्यश्री खरात, मीरा घुले, माधव प्रभुणे, उमेश आडागळे, अनिता पाटोळे या सर्वांचे सहकार्य लाभले. उपक्रम यशस्वी होण्यासाठी शंकर कणसे आणि वंदना माने यांनी प्रयत्न केले.


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ]