आगरकर स्मृती पुरस्कार २०२४

-

अंनिस, पुणे शाखेतर्फे आगरकर स्मृती पुरस्कार डॉ. शरद अभ्यंकर यांना व

डॉ. नरेंद्र दाभोलकर कार्यकर्ता पुरस्कार वसंत कदम यांना प्रदान

डॉ. कुमार सप्तर्षी यांनी पुणे अंनिसचे अध्यक्ष वसंत कदम यांचा ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर कार्यकर्ता पुरस्कार’ देऊन आणि ज्येष्ठ बुद्धिवादी विचारवंत डॉ. शरद अभ्यंकर यांचा गोपाळ गणेश आगरकर स्मृती पुरस्कार देऊन गौरव केला. या वेळी दिलशाद, ओम काळे, सलोनी शिंदे या दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्रक व पुस्तके देऊन सत्कार करण्यात आला. गोपाळ गणेश आगरकर पुरस्काराचे स्वरूप पाच हजार रु, डॉ. दाभोलकर यांची पुस्तके व स्मृतिचिन्ह तर डॉ. नरेंद्र दाभोलकर कार्यकर्ता पुरस्काराचे स्वरूप हे दोन हजार रुपये आणि दाभोलकर यांची पुस्तके व स्मृतिचिन्ह असे आहे.

पुरस्कारप्राप्त डॉ. शरद अभ्यंकर म्हणाले, “आगरकर ज्या काळात होते त्या काळात त्यांनी विधवा पुनर्विवाह, संमती वयात वाढ ही आग्रही भूमिका घेतली, विधवा केशवपनचा विरोध केला तसेच अनेक सामाजिक मुद्यांवर बुद्धिवादी भूमिका घेतली. त्याच दिशेने आम्ही वाई मध्ये संवाद करून कोणत्याही रिक्षावाल्याने लिंबू मिरची न लावण्याचा संकल्प पूर्ण केला. जातिभेद हे आपल्या समाजात लग्न आणि निवडणुकीच्या वेळी उफाळून येतात. त्याला आपण आळा घातला पाहिजे. गुरु नानक, गौतम बुद्ध, भगवान महावीर यांनी यज्ञाला विरोध केला होता. त्यामुळे कोणत्याही कर्मकांडाबद्दल आपण प्रश्न विचारले पाहिजेत. प्रसारमाध्यमे सुद्धा यज्ञाचा प्रसार करतात. राशिभविष्य, कुंभमेळा आणि मुंज प्रथांची सुद्धा आपण चिकित्सा केली पाहिजे. घर, शाळा, मित्रमंडळी आणि मीडिया या ठिकाणी अंधश्रद्धा विरोधात संस्कार केलेत पाहिजे.”

अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी म्हणाले, “आपल्या देशाची संस्कृती ही सहिष्णू आहे. संत ज्ञानेश्वरांनी भक्ती मार्ग अनुसरून ब्राह्मणी व्यवस्थेवर हल्ला केला. नशिबावर विश्वास ठेवल्याने मानवी संवेदनशीलता संपते. ब्राह्मणवादी व्यवस्थेत जिवंत असताना न्याय मिळत नाही, तर मृत्यूनंतर स्वर्गाचे आमिष किंवा नरकाची भीती दाखवली जाते. मृत्यूची जाणीव असल्यामुळे माणूस भ्याड बनतो आणि त्यामुळे माणूस अंधश्रद्धेला बिलगून बसतो. त्यामुळे मेंदूमध्ये संकुचित विचार करणार्‍या भागाला मिठी मारून राहणारे लोक हे प्रतिगामी होतात. सामाजिक परिवर्तनाचे काम करणार्‍या कार्यकर्त्यांना लोकांबद्दल आस्था आवश्यक असते. लोकांचा द्वेष करणार्‍या चळवळी यशस्वी होऊ शकत नाहीत. जात ही सगळ्यात मोठी अंधश्रद्धा आहे. दुसर्‍या जातीचे आणि धर्माचे लोक आपल्याला अनोळखी असतात आणि त्यामुळे आपणाला त्यांच्याबद्दल भीती व संशय वाटतो. म्हणून समाज विभाजन करणारी जातिव्यवस्था ही संविधानाने आपल्याला बदलायची आहे. त्यामुळे सामाजिक परिवर्तनासाठी सेवा दल, युक्रांद आणि अंनिस हे एकमेकांचे सहकारी आहेत. त्यांनी मिळून काम करणे आवश्यक आहे. समाजाला ब्राह्मणशाही व्यवस्थेपासून मुक्ती मिळवणे हे आपले ध्येय असेल पाहिजे.”

दुसरे पुरस्कार प्राप्त वसंत कदम म्हणाले, “आपण समाजात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा पुरस्कार केला पाहिजे. डॉटर, वकील हे अंधश्रद्धा पाळतात. समाजातील सुशिक्षित लोक नारायण नागबळी सारखे अंधश्रद्धा पाळून लाखो रुपये गमावतात. समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार झाला पण वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार झाला नाही आणि आपण सर्वांनी हे काम करू या.”

प्रास्तविक श्रीपाल ललवाणी यांनी केले. कार्यकर्ता भारत विठ्ठलदास यांनी सादर केलेल्या दिवा लावण्याच्या चमत्काराचा प्रयोग दाखवून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. परिचय राहुल माने आणि नवनाथ लोंढे यांनी करून दिला. पुणे अंनिसचे कार्याध्यक्ष अनिल वेल्हाळ यांनी सूत्रसंचालन केले. प्रकाश भारद्वाज यांनी आभार प्रदर्शन केले.


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ]