डॉ. अस्मिता बालगावकर -
मंगळवार दि. १० जून रोजी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सोलापूर शहर शाखा आयोजित जागतिक नेत्रदान दिनानिमित्त डॉ. तोष्णीवाल यांच्या नवनीत हॉस्पिटलमध्ये नेत्रदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी नेत्रदानाचे फॉर्म भरून दिले. उपस्थित सर्व नागरिकांना व रुग्णांना नेत्रदानाचे महत्त्व पटवून दिले. डॉ. नवनीत तोष्णीवाल यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कौतुक करत सदर उपक्रमास शुभेच्छा दिल्या. सदर उपक्रमात डॉ. अस्मिता बालगावकर, मधुरा सलवारु, निशा भोसले, शकुंतला सूर्यवंशी, सुनीता गायकवाड, अरुण गायकवाड, व्ही. डी. गायकवाड, आर. डी. गायकवाड, ग्रंथमित्र कुंडलिक मोरे, छाया मोरे इत्यादी कार्यकर्त्यांनी नेत्रदान फॉर्म भरले. उपस्थित नागरिकांनी अनेक प्रश्न व शंका विचारून उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला आणि अनेकांनी नेत्रदान फॉर्म भरले.
– डॉ. अस्मिता बालगावकर, अंनिस सोलापूर
