-
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते, फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांचे खंदे पुरस्कर्ते, आंतरजातीय विवाहाचे समर्थक, पुरोगामी विचार प्रत्यक्ष जगणारे आणि विवेकवादी व्यक्तिमत्व, पद्मभूषण कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेच्या विविध महाविद्यालयात २० वर्षे प्राचार्यपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळणारे प्राचार्य सीताराम नारायण गोसावी यांचे मंगळवार, दि. २३/०६/२०२६ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांचे देहदान बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात करण्यात आले आहे. त्यांच्या निधनामुळे गोसावी कुटुंबियांवर आणि समाजात एक भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे.रविवार दि. ०५ जुलै २०२६ रोजी प्राचार्य सीताराम नारायण गोसावी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ अहिल्यानगर येथील ’स्नेहालय’ या सामाजिक कार्य करणार्या संस्थेत तेथील अनाथ मुलांसाठी सहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
