मूल होत नसल्याच्या कारणावरून अघोरी पूजा

नंदिनी जाधव -

मूल होत नसल्याच्या कारणावरून एका विवाहितेकडून अघोरी पूजा करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार भिगवण (ता. इंदापूर, जि. पुणे) येथे उघडकीस आला. याबाबत भिगवण पोलीस ठाण्यात संबंधित विवाहितेने छळ आणि मूल होण्यासाठी अघोरी प्रकार केल्याची तक्रार दिली आहे. त्यानुसार पतीसह पाचजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये महिला मांत्रिक आणि तिच्या सहकारी महिलेचादेखील समावेश आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी एका 21 वर्षीय विवाहितेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपींवर भादंवि 498 (अ), 323, 594, 506, 34 व महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणाप्रतिबंध अधिनियम 2013 चे कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पती नितीन दिलीप कदम, सासरा दिलीप तुकाराम कदम, सासू सीमा दिलीप कदम यांच्यासह सोलनकर महिला (पूर्ण नाव माहीत नाही) (सर्व रा. भिगवण, ता. इंदापूर, जि. पुणे), स्वामी चिंचोली (ता. दौंड, जि. पुणे) येथे राहणारी आरोपी नं. 4 हिची सहकारी महिला (पूर्ण नाव माहीत नाही) अशा एकूण पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेची माहिती समजताच बारामती येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. ‘अंनिस’चे बारामती तालुका कार्याध्यक्ष विपुल पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, गेल्या काही दिवसांपूर्वी झारगडवाडी (ता. बारामती) येथे अघोरी पूजा करण्यात आली होती.

अपत्यप्राप्तीसाठी परिसरात अघोरी प्रकार सुरू आहेत. संबंंधित महिलेच्या डोक्यावरील केसाच्या बट उपटण्यात आली आहे. तसेच त्या महिलेच्या अंगावर लिंबू कापल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी महिला मांत्रिक व तिची सहकारी, अन्य तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सुरू आहे.

पुणे अंनिसची पोलीस स्टेशनला भेट व कारवाईची मागणी ः

भिगवण (ता. इंदापूर, जि. पुणे) येथे मूल होत नाही, यासाठी अघोरी पूजा करून सासरच्या लोकांनी मांत्रिक महिलांच्या सहकार्याने एका बावीस वर्षीय विवाहितेचा छळ केला. त्याबाबत गुन्हा दाखल होऊन पाच दिवस उलटले तरी आरोपींना अटक झाली नाही; उलट आरोपींनी फिर्यादींना शिवीगाळ करून मारहाणही केली होती. ‘म.अंनिस’च्या पुणे जिल्हा कार्यध्यक्ष नंदिनी जाधव यांच्याकडे पीडितेने अर्ज करून मदत करण्याची विनंती केली होती. राज्य प्रधान सचिव मिलिंद देशमुख व भगवान काळभोर यांना सोबत घेऊन नंदिनी जाधव यांनी आरोपींना लवकरात लवकर अटक करावी, असा भिगवण पोलीस स्टेशनला अर्ज दिला. स्थानिक कार्यकर्तेराजू देहाडे, भारत विठ्ठलदास, विपुल पाटील आदींसोबत सर्व पीडितांना भेटून धीर दिला; तसेच बारामती येथे जाऊन पोलीस उपाधीक्षक मिलिंद मोहिते सरांशी फोनवर बोलून त्यांना देखील अर्ज देऊन या प्रकारात लक्ष घालण्याची विनंती केली आहे. स्थानिक पत्रकारांनीही याबाबत सहकार्य केले; तसेच भिगवण रोटरी क्लबच्या पदाधिकार्‍यांनी ‘अंनिस’च्या टीमचे विशेष आभार मानले.


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ]