प्रा. ज्ञानदेव सरोदे -
‘महाराष्ट्र अंनिस’ बारामती शाखा आणि युवा चेतना सामाजिक संस्था यांच्या सहकार्यातून तेथील कार्यकर्त्यांसाठी 20 मार्च रोजी एकदिवसीय प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रशांत पोतदार (सातारा) यांनी ‘जादूटोणाविरोधी कायदा’ या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. मिलिंद देशमुख (पुणे) यांनी ‘चमत्कारामागील विज्ञान’ या विषयावर सादरीकरण केले. नंदिनी जाधव (पुणे) यांनी ‘स्त्रिया आणि शोषणाच्या बेड्या’ या विषयावर व्याख्यान दिले. अनिल वेल्हाळ (पुणे) यांनी ‘अंगात येणे, झपाटणे आणि मनोविकार’ या विषयावर सादरीकरण केले. श्रीपाल ललवाणी (पुणे) यांनी ‘अंनिस’ची धर्मविषयक भूमिका’ यावर व्याख्यान दिले. कार्यशाळेस उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना प्रशस्तिपत्रक, ‘अंनिस’ वार्तापत्राचे अंक आणि महिलांच्या आरोग्याविषयी पुस्तके देण्यात आली.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी युवा चेतना सामाजिक संस्थेचे संस्थापक मनोज पवार, प्रज्ञा काटे, सुषमा बनकर, शिवांजली जगताप, पूनम देशमुख, निकिता भापकर आदी. ‘अंनिस’ बारामतीतर्फे संयोजन समितीमध्ये प्रा. ज्ञानदेव सरोदे, हरिभाऊ हिंगसे, तुकाराम कांबळे, बाळकृष्ण भापकर, सुनील महामुनी, रंगनाथ नेवसे, दिनेश आदलिंगे, भारत विठ्ठलदास यांनी काम पाहिले.
– प्रा. ज्ञानदेव सरोदे, बारामती अंनिस