न्यायालयाचे खडे बोल

राजीव देशपांडे -

२० ऑगस्ट २०१३ रोजी पुणे येथे सकाळी सव्वासातच्या सुमारास डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा निर्घृण खून करण्यात आला. पुणे पोलिसांकडून तपासात कोणतीही प्रगती झाली नाही, तेव्हा ९ मे २०१४ रोजी उच्च न्यायालयाच्या आदेशाने हा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. पुढील सहा-सात वर्षांत सीबीआयने पाच आरोपींवर आरोपपत्र दाखल केले व २९ ऑटोबर २०२१ रोजी पुणे येथील नियुक्त सत्र न्यायालयासमोर पुरावा तपासण्यासाठी खटल्याची सुरुवात झाली. फिर्यादी पक्षाने वीस साक्षीदार तपासले. बचाव पक्षाने दोन साक्षीदार तपासले. (बचाव पक्षाचे हे दोन्ही साक्षीदार न्यायालयासमोर खोटी साक्ष देत आहेत असे दिसते. त्यामुळे त्यांची साक्ष आजिबात विश्वासार्ह नाही असे न्यायालयाने म्हटले आहे. पान क्र.१६२, मुद्दा क्र.१०२). खुनानंतर जवळपास ११ वर्षांनी १० मे २०२४ रोजी पुणे येथील विशेष सत्र न्यायालयात अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्रभाकर पी. जाधव यांनी सदर खून खटल्याचा निकाल सुनावला. सकाळी ११ वाजता हा निकाल जाहीर झाला, त्या वेळी अ‍ॅड. संजीव पुनाळेकर यांनी तपास यंत्रणेने खोटे साक्षीपुरावे सादर केल्याचा आरोप करून तपास यंत्रणेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारा अर्ज न्यायालयासमोर सादर केला. न्यायालयाने तो अर्ज फेटाळून लावला व निकाल वाचला.

या खटल्यातील पाच संशयित आरोपींपैकी सचिन अंदुरे व शरद कळसकर यांना प्रत्यक्ष खुनी म्हणून जन्मठेपेची म्हणजेच आजन्म सश्रम कारावासाची सजा सुनावण्यात आली. खुनाच्या गुन्ह्यासाठी फाशी किंवा जन्मठेप यापैकी एक सजा सुनावण्यात येते. फिर्यादी पक्षाने मारेकर्‍यांसाठी जन्मठेपेची सजा मागितली. ही डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या विचारधारेला साजेशी बाब आहे. हा दुर्मिळातील दुर्मीळ गुन्हा नसल्यामुळे फाशी व जन्मठेप यापैकी जन्मठेपेची सजा सुनावणे योग्य आहे, असे न्यायालयाने निकालात नोंदवले आहे. न्यायालयाचे हे निरीक्षण योग्यच आहे. ज्या गुन्ह्यात गोळीने माणूस मारून विचार संपवण्याचा प्रयत्न केला जातो, असा गुन्हा खरोखरच दुर्मिळातील दुर्मीळ स्वरूपाचा नाही असे आपले समाज वास्तव आहे. आरोपींना प्रत्येकी ५ लाख रुपये दंड सुनावण्यात आला. दंडाची रकम ठरवताना पीडित व्यक्तीच्या वारसांना द्यायची भरपाई व खटल्याचा खर्च लक्षात घ्यावा लागतो, असे मा. न्यायालयाने म्हटले आहे व पुढे असे नोंदवले आहे की, डॉटर नरेंद्र दाभोलकर यांनी त्यांचे संपूर्ण जीवन समाजकार्यासाठी वाहून घेतले होते. त्यांचे कुटुंबीय त्यांच्यावर आर्थिकदृष्ट्या अवलंबून नव्हते. त्यांची आर्थिक भरपाईची अपेक्षा नाही. पुणे पोलीस व सीबीआयने सदर गुन्ह्याच्या तपासासाठी प्रचंड मानवी शक्ती व मानवी तास खर्च केलेले आहेत. राज्य सरकारने तपास आणि आरोपींविरुद्ध खटला चालविण्यावर प्रचंड रकम खर्च केलेली आहे. या खर्चापैकी काही रकमेची भरपाई करण्याचा प्रयत्न करायला हवा.

उरलेले तीन आरोपी डॉ. विरेंद्रसिंह तावडे, अ‍ॅड. संजीव पुनाळेकर व विक्रम भावे यांना पुरेशा पुराव्याअभावी दोषमुक्त करण्यात आले. याबद्दल न्यायालयाने म्हटले आहे की, ‘आरोपी क्रमांक एक, डॉ. विरेंद्रसिंह तावडेंविरुद्ध डॉटर नरेंद्र दाभोलकर यांचा खून करण्याचा मोटिव्ह (हेतू) असल्याचा पुरावा आहे. आरोपी क्रमांक चार संजीव पुनाळेकर आणि आरोपी क्रमांक पाच विक्रम भावे यांच्याविरुद्ध सदर गुन्ह्यातील सहभाग दाखवील असा वाजवी संशय आहे…. परंतु विश्वासार्ह पुराव्याद्वारे या आरोपींचा गुन्ह्यातील सहभाग सिद्ध करण्यात तपास यंत्रणा अयशस्वी ठरलेली आहे.’ (पान क्र. १६३, मुद्दा क्र.१०४)

या निर्दोष मुक्ततेच्या विरुद्ध फिर्यादी पक्ष उच्च न्यायालयात अपील करेल अशी खात्री आम्ही (महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती) बाळगतो.

निकालामध्ये माननीय न्यायालयाने पान नंबर १९, २०, २१ वर, मुद्दा क्रमांक २ व ३ मध्ये फिर्यादी पक्षाने म्हणजेच सीबीआयने मांडलेली तथ्ये दिलेली आहेत. त्यात म्हटले आहे की,‘… Dr. Narendra Dabholkar was the force behind Andhashraddha Nirmoolan Bill, 2005 which was pending for legislation in August 2013 before the Maharashtra State Legislature. Organizations like Sanatan Sanstha and its sister organizations Hindu Janjagruti Samiti, Warkari Sampraday were opposing the said bill….. There was enmity/ hatred of Sanatan Sanstha against Dr. Narendra Dabholkar and Andhashraddha Nirmulan Samiti. Sanatan Sanstha was considering Dr. Narendra Dabholkar and his organization as anti Hindu. Sanatan Sanstha was bitterly opposing Dr. Narendra Dabholkar and his organization ANIS. In the backdrop of above history, on 20.08.2013. Dr. Narendra Dabholkar was murdered by two unknown persons by firing bullets… (डॉ. नरेंद्र दाभोलकर हे २०१३ मध्ये महाराष्ट्र विधीमंडळासमोर प्रलंबित असलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यामागील शक्ती होते. सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समिती, वारकरी संप्रदाय या त्यांच्या भगिनी संघटना सदर कायद्याला विरोध करत होते… सनातन संस्थेला डॉ. दाभोलकर आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्याप्रति शत्रुत्व आणि द्वेष होता. सनातन संस्था डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि त्यांच्या संस्थेला हिंदू विरोधी मानत होती… या इतिहासाच्या पार्श्वभूमीवर २०.८.२०१३ रोजी गोळ्या घालून दोन अनोळखी व्यक्तींनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून केला.)

निकालाच्या, ‘हेतू’ (मोटिव्ह : motive) या भागात पान क्र. ४७, ४८ वर मुद्दा क्रमांक २३ मध्ये म्हटले आहे की, In the further Cross Examination of PW4 (फिर्यादीचे साक्षीदार क्र. ४ हमीद दाभोलकर) the defence attempted to bring on record financial transactions of ANIS and his office bearers. The witness could not produce any documentary evidence about threats extended by Sanatan Sanstha or its activist to the deceased. However, at the same time, it is brought on record in cross examination itself that Sanatan Sanstha and its office bearers had made various complaints against ANIS and its trust to various tribunals and even before the court. Certainly we are not sitting here to enquire economic transactions of ANIS for its alleged irregularities. At this juncture, we have to see whether there were reasonable threats to the deceased from the Sanatan Sanstha and its activists as well as sister organizations. It is open secret that institute like Sanatan Sanstha and Hindu Janjagruti Samiti were opposing the activities of ANIS and particularly deceased Dr. Narendra Dabholkar blaming him. (फिर्यादीचे साक्षीदार क्र. ४ हमीद दाभोलकर.. यांच्या पुढील उलट तपासात बचाव पक्षाने अंनिस संस्था आणि पदाधिकार्‍यांचे आर्थिक व्यवहार अभिलेखात आणण्याचा प्रयत्न केला… सनातन संस्थेने किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी मृत व्यक्तीला दिलेल्या धमयांचा कागदोपत्री पुरावा सदर साक्षीदार सादर करू शकला नाही. परंतु त्याचवेळी उलट तपासातच हे अभिलेखित केले गेले की, सनातन संस्था आणि तिच्या पदाधिकार्‍यांनी अंनिस आणि त्यांचा ट्रस्ट यांच्या विरुद्ध विविध न्यायाधिकरणे आणि अगदी न्यायालयासमोर देखील विविध तक्रारी केलेल्या होत्या. कथित अनियमिततेबद्दल अंनिसच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यासाठी आम्ही निश्चितच येथे बसलेलो नाही. या ठिकाणी आम्हाला हे बघायचे आहे की, मृत व्यक्तीला सनातन संस्था व तिचे कार्यकर्ते तसेच तिच्या भगिनी संस्था यांच्याकडून वाजवी धोका (reasonable threats) होता का? सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समिती सारख्या संस्था अंनिसच्या कार्यक्रमांना व विशेषतः मृत डॉ. नरेंद्र दाभोलकरांना दोष देत विरोध करत होते हे उघड सत्य आहे.) तथाकथित आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप करून मूळ मुद्यापासून लक्ष भरकटवणार्‍यांना मा. न्यायालयाने येथे चपराक दिली आहे.

पान क्रमांक ५२ वर मुद्दा क्रमांक २५ मध्ये मा. न्यायालयाने म्हटले आहे की, Thus in the cross examination of PW8 (फिर्यादीचे साक्षीदार क्र. ८ प्रशांत पोतदार) also, the defence has attempted to bring on record the enmity of various persons and institutions against deceased. At the same time it is brought on record by the defence itself that Sanatan Sanstha and its activists were making applications against deceased and ANIS to police stations, tribunals and filed complaint in the court.Thus from cross examination itself, it is crystal clear that Sanatan Sanstha, Hindu Janjagruti Samiti and all Hindu organizations were bitterly opposing the deceased and activities of ANIS. It is further established by defence itself by putting suggestion to the prosecution witness that the accused are connected with Sanatan Sanstha. (फिर्यादी पक्षाचे साक्षीदार क्रमांक ८… प्रशांत पोतदार… यांच्या उलट तपासणीत देखील बचाव पक्षाने डॉ. दाभोलकरांप्रति विविध व्यक्ती व संस्थांना असलेले शत्रुत्व अभिलेखित करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी स्वतः बचाव पक्षानेच हे अभिलेखित केलेले आहे की सनातन संस्था आणि तिचे कार्यकर्ते हे मृत व्यक्ती आणि अंनिसबद्दल पोलीस स्टेशन व न्यायाधिकरणासमोर अर्ज करत होते आणि त्यांनी न्यायालयात तक्रार केली होती….. अशा प्रकारे (बचाव पक्षाने स्वतः घेतलेल्या) या उलट तपासणीमधूनच हे स्वच्छ स्पष्ट होते की, सनातन संस्था, हिंदू जनजागृती समिती आणि सर्व हिंदू संघटना हे डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि अंनिसच्या कार्यक्रमांना कडवटपणे विरोध करत होते. फिर्यादी पक्षाच्या साक्षीदाराला प्रश्न विचारून स्वतः बचाव पक्षाने हे स्थापित केले आहे की आरोपी हे सनातन संस्थेशी संबंधित आहेत.) अशा प्रकारे बोगस डॉटर किंवा इतर कोणावर खुनाचा आरोप करण्याच्या प्रयत्नाला मा. न्यायालयाने येथे चपराक दिलेली आहे.

पान क्रमांक ६० वर मुद्दा क्रमांक ३१ मध्ये फिर्यादी पक्षाचे साक्षीदार क्रमांक ९, संजय साडविलकर यांच्या साक्षीबद्दल चर्चा केल्यानंतर मा. न्यायालयाने म्हटले आहे की, Certainly at this juncture, we are discussing about the motive behind murder of Dr. Narendra Dabholkar. The witness has categorically stated as to how he came in contact with accused No.1, Virendrasinh Tawade and how accused No. 1 Virendrasinh Tawade was associated with the activities of Sanatan Sanstha against ANIS and particularly Dr. Narendra Dabholkar. To that extent, the evidence of PW9 is nowhere shaken. On the contrary the connection of accused number 1 with Sanatan Sanstha and his activities against ideology of ANIS and enmity with Dr. Narendra Dabholkar is duly established through this witness. म्हणजे येथे न्यायालयाने असे म्हटले आहे की आरोपी क्रमांक एक डॉटर विरेंद्रसिंह तावडे यांचा सनातन संस्थेशी असलेला संबंध आणि अंनिसच्या विचारधारेविरोधातील त्यांच्या कृती आणि नरेंद्र दाभोलकर यांच्याप्रति असलेले शत्रुत्व हे या साक्षीदारामार्फत विधिवत सिद्ध झाले आहे.

प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि इतर साक्षीदार यांच्या साक्षी फिर्यादी पक्षाने सादर केल्या. फोनचे सीडीआर, सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्ष शस्त्र किंवा मोटरसायकल असे पुरावे फिर्यादी पक्षाने सादर केले नाहीत. वेळीच तपास करून फिर्यादी पक्षाने जर हे पुरावे मिळवले असते तर या पुराव्यांच्या आधारे ते या गुन्ह्याच्या मास्टरमाईंडपर्यंत पोहोचू शकले असते. पुढील तीन विवेकवाद्यांचे खून टाळू शकले असते. या चारही विवेकवाद्यांचे खून तसेच नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरण यातील काही आरोपी समान आहेत. या केसच्या तपासात सीबीआयकडून सुटलेल्या किंवा त्यांनी दुर्लक्ष केलेल्या गोष्टी इतर चार खटल्यांमध्ये सिद्ध होतील अशी अपेक्षा आपण करू.

या खटल्यामध्ये एकाही आरोपीला यूएपीए म्हणजेच Unlawful Activities Prevention Act या कायद्याखाली शिक्षा झाली नाही यामागे तांत्रिक कारण आहे. हा कायदा लागू होण्यासाठी सरकारी अधिकार्‍यांनी ठराविक मुदतीत हा कायदा लावण्याची शिफारस करावी लागते. संबंधित दोन सरकारी अधिकार्‍यांनी या तांत्रिक बाबींची पूर्तता केली नाही. त्यामुळे कोणत्याही आरोपीला यूएपीए लागू झालेला नाही. याबद्दल पान १३४, मुद्दा क्र. ८१ मध्ये मा. न्यायालयाने म्हटले आहे की, या दोन साक्षीदारांनी (या दोन सरकारी अधिकार्‍यांना फिर्यादी पक्षाने साक्षीदार म्हणून तपासले आहे) सीबीआयने सादर केलेल्या प्रस्तावावर स्वतःचे माइंड अप्लाय केलेले नाही. त्यांच्यामध्ये गांभीर्याचा अभाव स्पष्ट दिसून येतो… ही केस अतिशय गंभीर आहे. राष्ट्रीय महत्त्वाची आहे, असे असताना देखील या दोन साक्षीदारांचा प्रासंगिक व निष्काळजी दृष्टिकोन (Casual and Negligent Approach) हा धकादायकच नाही तर निंदनीय आहे.

निकालाच्या शेवटाकडे मा. न्यायालयाने पान क्रमांक १६६ वर मुद्दा क्रमांक १०८ मध्ये पुढील मुद्दे मांडले आहेत… Admittedly, except ideological differences with deceased Dr. Narendra Dabholkar, the accused Nos. 2 and 3 were not having any personal enmity or rivalry against Dr. Narendra Dabholkar. The murder is committed with very well prepared plan, which is executed by accused Nos. 2 and 3. Considering the economical and social status of the accused Nos. 2 and 3, they are not the master minds of the crime. The main master mind behind the crime is someone else. Pune police as well as CBI has failed to unearth those master minds. They have to introspect whether it is their failure or deliberate inaction on their part due to influence by any person in powers. It is interesting to note here that in the present case, charge-sheeted accused and defence counsels have not merely attempted to raise the defence. From unnecessary and irrelevant lengthy cross-examination of the prosecution witnesses and even in final argument, an attempt is made to tarnish image of the deceased. At the same time, the approach of the defence was to justify the killing of the deceased Dr. Narendra Dabholkar, by labeling him as anti Hindu. In said attempt, advocate Shri. Salshingikar referred the yearly magazine Exh. 376, which is published after more than five years, after the death of Dr. Narendra Dabholkar. The said approach is very strange and is condemnable. As already observed, it is not an exclusive act of accused Nos. 2 and 3, but definitely, there is preplan by master minds. Unfortunately, the prosecution has failed to unmask those master minds. (आरोपी क्रमांक दोन आणि तीन…सचिन अंदुरे, शरद कळसकर.. यांचे डॉ. नरेंद्र दाभोलकरांशी असलेले वैचारिक मतभेद सोडले तर त्या दोघांचे डॉ. नरेंद्र दाभोलकरांशी कोणतेही वैयक्तिक शत्रुत्व नव्हते. अत्यंत नियोजनबद्ध प्लॅन करून डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा खून करण्यात आला, तो या दोन आरोपींनी अमलात आणला. आरोपी क्रमांक दोन व तीन यांची आर्थिक व सामाजिक स्थिती लक्षात घेता ते या गुन्ह्यामागचे सूत्रधार (master mind) नाहीत. गुन्ह्यामागील मुख्य सूत्रधार दुसरे कोणीतरी आहेत. हे सूत्रधार उजेडात आणण्यात/खणून काढण्यात पुणे पोलीस व सीबीआय अपयशी ठरले आहेत. हे त्यांचे अपयश आहे की सत्तेतील एखाद्या व्यक्तीच्या प्रभावामुळे राखलेली त्यांची हेतुपुरस्सर निष्क्रियता आहे याचे त्यांनी आत्मपरीक्षण करावे. या केसमध्ये आरोपपत्र दाखल झालेले आरोपी आणि बचाव पक्षाचे वकील यांनी फक्त बचाव मांडण्याचा प्रयत्न केला नाही (तर त्यांनी) फिर्यादी पक्षाच्या साक्षीदारांच्या अनावश्यक आणि असंबद्ध अशा लांबलचक उलटतपासणीमधून आणि अंतिम युक्तिवादात देखील मृत व्यक्तीचे प्रतिमाभंजन करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी डॉ. नरेंद्र दाभोलकरांवर हिंदूविरोधी असा शिका मारून त्यांच्या खुनाचे समर्थन करण्याचा बचाव पक्षाचा दृष्टिकोन होता. या प्रयत्नात अ‍ॅड. साळशिंगीकर यांनी एका वार्षिक अंकाचा संदर्भ दिला, जो डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या मृत्यूनंतर पाच वर्षांनी प्रसिद्ध झाला होता. हा दृष्टिकोन अत्यंत विचित्र (स्ट्रेंज) आणि निंदनीय आहे. या आधी नोंदवलेल्या निरीक्षणाप्रमाणे ही फक्त आरोपी क्र. दोन आणि तीन यांनी केलेली कृती नाही, परंतु निश्चितपणे येथे सूत्रधारांनी केलेले पूर्वनियोजन आहे. दुर्दैवाने फिर्यादी पक्ष या सूत्रधारांचा मुखवटा उघड करण्यात अयशस्वी ठरला आहे.

हा निकाल १७० पानी आहे. कायद्याचे प्रशिक्षण न घेतलेल्या सामान्य व्यक्तीला देखील सहज समजू शकेल अशा सुलभ, प्रवाही इंग्रजीमध्ये तो लिहिलेला आहे. पान क्र. १२५, मुद्दा क्र. ७२ मध्ये मा. न्यायालयाने म्हटले आहे की, ‘ही केस खूप गंभीर व राष्ट्रीय महत्त्वाची आहे. केवळ डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा खून केलेला नाही तर त्यांची विचारधारा संपविण्याचा प्रयत्न केलेला आहे. गुन्ह्याचे गांभीर्य (Seriousness and Gravity) आणि त्याचे एकूण महत्त्व लक्षात घेता (निकालात) फिर्यादीचे साक्षीदार १ ते २० यांच्या पुराव्याची विस्ताराने चर्चा केलेली आहे.’ त्यामुळे ज्यांना साक्षीपुराव्यांचे तपशील व विश्लेषण जाणून घ्यायचे आहे त्यांनी या खून खटल्याचा १७० पानी निकाल जरूर वाचावा.

भोवतालच्या परिस्थितीमुळे निराश व हताश न होता त्या परिस्थितीत विधायक हस्तक्षेप करणे, हे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या कार्याचे सूत्र होते. डॉ. नरेंद्र दाभोलकरांवर गोळ्या झाडून त्यांचा खून करणारे दोघे तरुण विखारी विचारधारेच्या आहारी गेले व स्वतः विखारी बनले. वेगवेगळ्या टोकाच्या व हिंसक विचारांच्या आहारी गेलेले, स्वतःचे व कुटुंबीयांचे नुकसान करून घेणारे असे असंख्य तरुण निर्माण करणार्‍या सामाजिक, राजकीय, आर्थिक यंत्रणा आज समाजात बलशाली आहेत. आपल्या विवेकाच्या, सर्जनशीलतेच्या आणि हिमतीच्या आधारे अहिंसक पद्धतीने आपल्याला त्यांचा सामना करायचा आहे. तरुणांची डोकी फिरविणार्‍यांपासून त्यांना दूर करणे हे काम आता महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कायम करत राहील!


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ]